28 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान चंद्रपूर येथे मृत्यू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
      
मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मुकटा येथील एका 28 वर्षीय युवकाने विषारी द्रव्य प्राशन आपली जीवन यात्रा संपवल्याची दुर्देवी घटना घडली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

प्रफुल उत्तम तुराणकर (28) असे विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या युवकाने काल शुक्रवारी 26 मे च्या सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास विष प्राशन केले होते. घटनेची माहिती मिळताच त्याला तातडीने चंद्रपूर येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले होते, कालपासून त्याच्यावर उपचार सुरु असताना आज उपचारादरम्यान सकाळी 6 वाजताचे दरम्यान, त्याने अखेरचा श्वास घेतला.
   
अविवाहित प्रफुल हा पुणे येथील एका खासगी कंपनीमध्ये काम करीत होता.गेल्या काही दिवसापासून तो नुकताच मुकटा येथे आई वडीला कडे आला होता. मात्र, दरम्यान त्याची मानसिक स्थिती चिंताग्रस्त असल्याचे जाणवत असताना त्यानी आई वडिलांना शेअर केली नाही. काल दि. 26 मे ला पुणे येथे परत जाणार होता. त्यामुळे आई त्यांचेसाठी डब्बा बनवून द्यायच्या कामात व्यस्त होती. तर वडील जनावरांना चारापाणी करायला गेले असताना प्रफुलने घरी असलेली विषारी द्रव्य प्राशन केले. एवढ्यात त्याला उलटी झाली या उलटीतून वास आल्याचे आईच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ वडिलांना बोलावून प्रफुलला चंद्रपूर येथील खाजगी दवाखाण्यात भरती केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. त्याचा मृतदेह चंद्रपूर येथून मूकटा येथे जन्मगावी आणवून येथेच त्याचा अंतसंस्कार करण्यात आला आहे.
 प्रफुलच्या मागे आईवडील,दोन भाऊ आणि आप्तपरिवार आहे.
28 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान चंद्रपूर येथे मृत्यू 28 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान चंद्रपूर येथे मृत्यू Reviewed by सह्याद्री चौफेर on May 27, 2023 Rating: 5
Powered by Blogger.