सभापती गौरीशंकर खुराणा यांचा पुसद अर्बन बँके तर्फे सत्कार


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

 मारेगाव : मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त सभापती गौरीशंकर खुराणा यांचा पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी बॅकेच्या वतीने पुसद येथील बँक कार्यालयात सत्कार करण्यात आला, यावेळी बँकेचे उपाध्यक्ष राकेश खुराणा उपस्थित होते.
     
नेहमी शेतकऱ्याचे हित जोपासणारे गौरिशंकर खुराणा हे झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आघाडीचे मताधिक्य घेऊन महाविकास आघाडीच्या शेतकरी एकता पॅनल मध्ये निवडून आले,त्यानंतर त्यांची सभापतीपदी बहुसंख्य संचालकानी त्यांना पाठिंबा देत अविरोध निवडून दिले. या घटनेचे पुसद अर्बन बँकेने दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आला.

या सत्कार कार्यक्रमाच्या प्रसंगी गौरीशंकर खुराणा यांनी आपण शेतकरी हिताचे निर्णय घेऊ असे सांगीतले, यावेळी पुसद अर्बन बँकेचे उपाध्यक्ष राकेश खुराणा, संचालक ललित सेता, निळूभाऊ पाटील, सौ पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक सेवकर, सुरोसे व बॅक कर्मचारी उपस्थित होते .
सभापती गौरीशंकर खुराणा यांचा पुसद अर्बन बँके तर्फे सत्कार सभापती गौरीशंकर खुराणा यांचा पुसद अर्बन बँके तर्फे सत्कार Reviewed by सह्याद्री चौफेर on May 26, 2023 Rating: 5
Powered by Blogger.