सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी-घोन्सा : नव्याने उभी राहणारी राजकीय व्यवस्था ही आदिवासींचा मानवी सन्मान नाकारुन शोषणावर आधारित अमानवीय व दमणकारी राजकीय व्यवस्था निर्माण करु पहात असून, आज होणारी आदिवासी सन्मान परिषद ही या व्यवस्थेविरुद्ध आदिमांचा उलगुलानकारी एल्गार आहे, असे विचार अखिल भारतीय संवैधानिक हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. गीत घोष यांनी परिषदेचे प्रमुख वक्ते म्हणून बोलत असताना मांडले. ते बिरसा क्रांती दल ने आयोजित केलल्या आदिवासी सन्मान परिषद प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
स्थानिक आदर्श हायस्कूल च्या प्रांगणात या परिषदेचे आयोजन बिरसा क्रांती दल शाखा घोन्साने केले होते.परिषदेचे अध्यक्ष बिरसा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दशरथजी मडावी हे होते,तर या परिषदेचे उद्घाटन मा.संजीवरेड्डी बोदकुरवार आमदार वणी विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते झाले. या परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.मंगेशजी मोहुर्ले,सरपंच ग्रा.पं,घोन्सा, सौ.मंगलाताई बेसरकर सदस्य ग्रा.पं. घोन्सा, डॉ.संदीप येडमे, वैद्यकीय अधिकारी घोन्सा, मा. गोपाल मश्राम, सचिव ग्रा.पं.घोन्सा, महेश उराडे, माजी.पं.स.सदस्य वणी हे तर प्रमुख वक्ते म्हणून मा.गीत घोष, उत्तमरावजी गेडाम, मा. गटशिक्षणाधिकारी, आर.जी. गेडाम, माजी गटविकास अधिकारी आणि परिषदेचे स्वागताध्यक्ष मा.निळकंठराव जमनाके गुरुजी हे उपस्थित होते. पुढे बोलताना गीत घोष म्हणाले की, आदिवासी समाज हा मानवी समाजाचे आरंभ व आस्तित्व असताना आज आपल्या त्याच्या सन्मासाठी लढावे लागते आहे ही आपल्या जीवंत माणसांची फार मोठी शोकांतिका आहे,आणि सत्य बोलणाऱ्याचा ईथे तिरस्कार केला जातो. हे त्यापेक्षा आजून वेदनादायी आहे. अन्याय ईतका वाईट नाही जेवढे चुपचाप बसणे, बोलायला शिका अन्यथा आपल्या पिढ्या मुख्या होतील याचे भाण आम्ही आपल्या लोकांना दिले पाहिजे असेही ते पुढे म्हणाले. मा.दशरथजी मडावी म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासींचे योगदान, संस्कृती संवर्धन, इतिहासाची गौरवपूर्ण मांडणी हे आमच्या बिरसा क्रांती दलाचे प्रमुख कार्य असून आदिवासींचा सन्मान वाढवून घेणे हे आमचे ध्येय आहे. या प्रसंगी मा.रंगराजी काळे, उत्तमरावजी गेडाम, आर.जी. गेडाम यांचीही भाषणे झालीत.
कार्यक्रमाचे प्रास्तविक, संजय मडावी यांनी केले, संचालन, गजानन बेसरक तर आभार, राजेश मेश्राम सर यांनी मानले. ही सन्मान परिषद यशस्वी करण्यासाठी अशोक बेसरकर, तिरंजित सुरपाम, विजय सिडाम,ज्ञानेश्वर जुमनाके,सचिन चांदेकर, अनंता सोयम आदी सर्व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.
ही परिषद मानवी हक्क नाकारणाऱ्या राजकीय व्यवस्थेविरुद्ध आदिमांचा उलगुलाणकारी एल्गार आहे - गीत घोष
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 21, 2023
Rating:
