कोळशाच्या चोर बाजारात नागरिकांचे आरोग्य धोक्यात


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या  यवतमाळ हायवेवर बोटोणी येथील अगदी आनंदी धाब्याला लागूनच कोळशाचा चोर बाजार भरविण्यात आला आहे. मात्र, या कोळसाचा चोर बाजारामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

बोटोणी येथील रेस्टॉरंटला लागून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वणी एरिया, एकोणा एरिया येथील ट्रक कोळशाची चोरी करून खुल्या बाजारात विक्रीसाठी आणले जातात. किंबहुना चोरीचा कोळसा याठिकाणी हेरफेर केला जात आहे. आनंदी ढाबा हा लांब प्रवाशी तथा वाहतूक दाराच्या खाणावळी साठी फेमस असल्यामुळे या ढाब्यावर मोठया प्रमाणात वाहन चालक, मालक तथा विशेष ग्राहक भोजनाचा स्वाद साठी येत असतात. मात्र, गेल्या काही महिन्यापासून येथे कोळसा माफियानी कोळशाचा चोर बाजार भरवीला आहे. त्यामुळे कोळसाचा धूर (Dust) जेवणातून शरीरात जात असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

कोळसा खाणीतून तस्करी झालेल्या कोळसाची अवैध वाहतूक करून येथील ढाब्याजवळच असलेल्या चोरबाजारात हा कोळसा आणला जातो, या चोर बाजारात दर दिवशी ५० ते ६० टन कोळशाचा अवैध व्यापार होत असताना आता पर्यंत ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे हा व्यवसाय मोठया प्रमाणात फोफावला आहे.

परिणामी या अवैध कोळसा मोकळ्या जागेवर उतरत असलेल्या कोळसाचा धूर (Dust) जेवणासाठी आलेल्या ग्राहकांच्या भोजनातून जात असल्याची तक्रार ग्राहकांकडून होत आहे. हा अवैध डेपो चालकावर अजून पर्यंत कुठलीही कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली नसल्याने प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. तूर्तास येथील परिसर प्रदूषण युक्त झाला असून येथील डेपोवरती कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.
कोळशाच्या चोर बाजारात नागरिकांचे आरोग्य धोक्यात कोळशाच्या चोर बाजारात नागरिकांचे आरोग्य धोक्यात Reviewed by सह्याद्री चौफेर on May 22, 2023 Rating: 5
Powered by Blogger.