चायला...पिसगांव येथे राजरोसपणे वरली मटका


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सर्वात जास्त पैसा देणारे क्षेत्र म्हणून आजही सट्टा मटका क्षेत्राचे नाव सातासमुद्रपार आहे. त्यामुळे पिसगांव येथे राजरोसपणे वरली मटका सुरू असून याकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप तथा नागरिकांतून कुजबुज होत आहे.

गेल्या काही दिवसापासुन पिसगांव येथे वरली मटका व्यवसाय जोमात खुलेआमपणे सुरू आहे. छोटया गावाच्या च्या ठिकाणी सुरू असलेला हा मटका घेणारे एजंट व खेळणाऱ्या मटकाबहाद्दरांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यांचे पोलिसासोबत लागेबांधे असल्याची चर्चा होत आहे. पिसगांव येथील मटका पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अनेकांचे संसार या वरली मटक्यामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गांवर असून या ठिकाणी रोज चिकार पैसा ची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. येथे सुरु असलेल्या एक मटका पट्टी नाही तर दोन दोन मटका पट्टी घेणाऱ्यावर कुठल्याही प्रकारचे अंकुश या ठिकाणी लावण्यात येत नसल्याचे दिसत आहे. मागील वर्षी वृत्तपत्रांतुन बातम्या झळकताच अमरावती येथील गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने वणी उपविभागात धाड टाकली होती. यावेळी केवळ तेथे काम करणाऱ्या अनेकांना अटक, तर काहींनी पोबारा केला होता. परंतु वरली मटका व्यवसाय करणाऱ्या संचालकाला अटक करण्यात आलेली नव्हती. मात्र, वरली मटका संचालकात पुरती दणादण उडाली होती. येथील वरली मटका सुरू असलेल्या गावात पोलीसाची ड्युटी असुन सदर कर्मचाऱ्याचे हात ओले होत तर नाही, अशी चर्चा धडाक्यात सुरू आहे. याची साधी भनक सुध्दा वरिष्ठांना लागत नाही. त्यामुळे आता वरिष्ठांनी तातडीने दखल घेऊन पिसगांव येथील वरली मटका व्यवसाय बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे. आता स्थानिक पोलीस धाड टाकुन या व्यवसायाच्या मुख्य संचालकाला अटक करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


खरंतर एका छोटाश्या गावात एक नाही तर दोन दोन मटका संचालक आकडे घेतात ही शोकांतिका आहे. हे गावाच्या व पुढील दृष्टीने फार धोकादायक आहे. गावातील तरुण, युवक व विद्यार्थी तथा विद्यार्थीनी करिता अतिशय क्लिष्ट अशी बाब आहे. यांचा फार वाईट परिणाम तरुण पिढीवर होणार आहे. त्यामुळे येथील सुरु असलेला अवैध मटका बंद करावा.. अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने गावाकऱ्यांना घेऊन आंदोलन किंबहुना जिल्हा अधीक्षक डॉ. बनसोडे साहेब यांना याबाबत अवगत करावे लागेल.

-मारोती गौरकार 
तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी, मारेगाव
चायला...पिसगांव येथे राजरोसपणे वरली मटका चायला...पिसगांव येथे राजरोसपणे वरली मटका Reviewed by सह्याद्री चौफेर on May 08, 2023 Rating: 5
Powered by Blogger.