वंचीत बहुजन यूवा आघाडीची मारेगाव तालुक्याची नवीन कार्यकारणी गठीत

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : वंचीत बहुजन यूवा आघाडीची मारेगाव तालुक्याची नवीन कार्यकारणी गठीत वंचीत बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये यवतमाळ महिला जिल्हा अध्यक्ष धम्मवतीताई वासनिक तथा जिल्हा साचिव भारतीताई सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगावसाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक तसेच पक्षवाढीच्या उद्देशाने नवीन कार्यकारी वर जबाबदारी देण्यात आली आहे. व पदाचा उपयोग करुन पक्षाला नव्या उंचीवर नेण्यासाठी कटिबध्द व्हाल अशी अपेक्षा घोषीत केली, तरी नवीन कार्यकारी मध्ये मारेगावचे युवा तालुका अध्यक्ष विजय दादा कांबळे आणि शहराध्यक्ष डॉ प्रोवोज हाजराजी यांची निवड करण्यात आलेली आहे,

तर युवा शहर सचिव शुभम बेहाळे, आणि शहर उपाध्यक्ष मोरेश्वर खैरे, तालुका सचिव प्रयाग रामटेके दादा यांची निवड झालेली आहे, महिला शहर कार्यकारिणी मध्ये शोभाताई माणिकराव दारुंडे अध्यक्ष, सचिव रेखाताई काटकर, यांची निवड झालेली आहे तसेच मारेगाव महिला तालुका अध्यक्ष नूतनताई तेलंग, तर सचिव सुनीता खैरे यांची निवड करण्यात आलेली आहे.

यावेळी वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, जिल्हा महासचिव मिलिंद पाटिल, जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग, मारेगाव तालुका अध्यक्ष गौतम दारुंडे, तालुका उपाध्यक्ष संजय जिवने, अनंता खाडे, शुभम बेहाळे, संजय पाटिल, प्रफुल भगत, रमेश चिकाटे, दिलीप पाटिल, सुधाकर भगत, यशवंत फुलझेळे, गौरखनाथ पाटिल आदिसह असंख्य वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 
वंचीत बहुजन यूवा आघाडीची मारेगाव तालुक्याची नवीन कार्यकारणी गठीत वंचीत बहुजन यूवा आघाडीची मारेगाव तालुक्याची नवीन कार्यकारणी गठीत Reviewed by सह्याद्री चौफेर on May 08, 2023 Rating: 5
Powered by Blogger.