इंडोनेशियात होणाऱ्या वर्ल्ड युनिव्हर्सल लीडरशिप समेट २०२३ (universal youth leadership summit- 2023 indonesia) करिता संदीप गोहोकार यांची निवड


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : वणीतील आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शाळा वनोजादेवी येथे कार्यरत असलेले शिक्षक संदीप उर्फ सुगम संजय गोहोकार यांची इंडोनेशियातिल बाली मध्ये होणाऱ्या जागतिक पातळीवरील वर्ल्ड लीडरशिप परिषद - २०२३ साठी निवड झाली आहे. शंभर च्या जवळपास देशातील युवक या परीषद मध्ये सहभागी होतील.

भारतात आधीपासूनच वसुदैव कुटुंबकम ची संकल्पना राबविली जाते. आज जागतिक सीमा नष्ट होऊ पाहत आहे. शिक्षणाच्या नवनवीन संधी आज जागतिक पातळीवर उपलब्ध होत आहे त्या साठी फ़क्त कौशल्याची गरज आहे. भविष्यातील नेतृत्व करणारे, नैतिक पातळी जपणारे, नवनिर्मिती व दिशादर्शक युवक, ज्यांच्याकडे भविष्याच विजन आहे अशा युवकांचा शोध घेऊन जागतिक परीषदेच्या माध्यमातुन निवड केली जाते.
महत्त्वाचे म्हणजे जागतिक सामाजिक व राजकीय प्रश्नावर ही परिषद असते.संदीप ने सामाजिक बांधिलकी जोपासत क्वालिटी एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट या सामाजिक प्रश्नावर कार्य व पेपर सादर केला आहे .यामध्ये वर्ल्ड युनिव्हर्सल लीडरशिपच्या समेट 2023 च्या आयोजकांनी जागतिक पातळीवरील 30 वर्ष च्या आतमधल्या व देशातील निवडक युवकांमध्ये वणीतील संदीप गोहोकार यांची निवड केली आहे.

"परिषद वरून आल्यावर तिथले अनुभव आपल्या समजापर्यंत पोहचू व त्याचा फायदा आपल्या कडील युवकांना कसा होईल या प्रयत्नात राहू तसेच उच्च शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी या विषयावर पुढे काम करणार आहोत आणि माझ्या या निवडीमध्ये सर्वात मोठा वाटा माझ्या मित्रांचा आहे". असे प्रतीपादन संदीप उर्फ सुगम गोहोकार यांनी केले आहे.
इंडोनेशियात होणाऱ्या वर्ल्ड युनिव्हर्सल लीडरशिप समेट २०२३ (universal youth leadership summit- 2023 indonesia) करिता संदीप गोहोकार यांची निवड इंडोनेशियात होणाऱ्या वर्ल्ड युनिव्हर्सल लीडरशिप समेट २०२३ (universal youth leadership summit- 2023 indonesia) करिता संदीप गोहोकार यांची निवड Reviewed by सह्याद्री चौफेर on May 09, 2023 Rating: 5
Powered by Blogger.