वणी येथील रक्तदान शिबिराला नागरिकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : सामाजिक उत्तरदायित्व जाणीवेतून यवतमाळ जिल्हा पोलीस दला द्वारा आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात 1111 लोकांनी रक्तदान केले आहे. या रक्तदान शिबिरात नागरिकांनी विक्रमी रक्तदान केल्याने सहभागी झालेल्या रक्तदात्यांचे आयोजकांच्या वतीने आभार मानले जात आहे.
"रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच श्रेष्ठदान" असं म्हटलं जातं. रक्त हे कृत्रीमरित्या तयार करता येत नाही तसेच मानवी रक्तघटक ठराविक काळच साठविता येतात त्यामुळे सातत्याने रक्त संकलीत करणे आवश्यक असते. वेळेची गरज, सामाजिक कर्तव्याची जाण ठेऊन रक्तदान हे सुरु राहीले पाहिजे. याकरिता रक्तदानाची नितांत गरज आहे.
पोलिस दलांनी रक्तदानाची असलेली गरज ओळखून भव्य रक्तदान शिबीर घेण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेतला. वणी येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करून नागरिकांनीही या शिबिराला भरभरून प्रतिसाद देत विक्रमी रक्तदान केले. जवळपास 1111 रक्तदात्यांनी शिबिरात रक्तदान केल्याची ही जिल्ह्यातील विक्रमी नोंद आहे. अशी माहिती पोलीस खात्यानी दिली. शौर्य ब्लड सेंटर यवतमाळ व एकनिल ब्लड सेंटर यवतमाळ येथील टीम ने रक्त संकलन  केलं. या शिबिराला वणी व मारेगाव तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपविभागातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने वणी पोलिस स्टेशन येथील दक्षता हॉल ला येऊन रक्तदान केलं. सहभाग नोंदवलेल्या रक्तदात्यांचे आयोजकांच्या वतीने विशेष आभार मानले. डॉ. पवनकुमार बन्सोड (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, यवतमाळ, श्री पियुष जगताप अपर पोलीस अधिक्षक, यवतमाळ यांचे सहकार्य लाभले आहे. 
या शिबीराकरीता ठाणेदार प्रदीप शिरस्कर, शिरपूर पोलिस स्टेशनचे सपोनि गजानन करेवाड, मुकुटबनचे पोलिस स्टेशनचे सपोनि अजित जाधव, एपीआय माया चाटसे, वणी वाहतूक उपशाखेचे पोलिस उपनिरीक्षक संजय आत्राम, डीबी पथक प्रमुख माधव शिंदे, सपोनि प्रवीण हिरे, सपोनि आशिष झिमटे तथा जमादार व सर्व पोलिस कर्मचारी, वाहतूक शाखा व डीबी, एलसीबी पथकाने अथक परिश्रम घेतले.
वणी येथील रक्तदान शिबिराला नागरिकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद वणी येथील रक्तदान शिबिराला नागरिकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद Reviewed by सह्याद्री चौफेर on May 17, 2023 Rating: 5
Powered by Blogger.