सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडीकरिता 23 मे रोजी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहामध्ये सभा दुपारी 1 वाजता घेण्यात येणार असल्याची नोटीस प्राधिकृत अधिकारी आर. बी. निनावे यांनी काढली आहे. यावेळी सभापती व उपसभापती पदी कुणाची निवड केली जाते याकडे निवडून आलेल्या संचालकांचे लक्ष लागले आहे.
मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस 13, सेना 4, भाजप 1 उमेदवारांनी विजय मिळाला आहे. यंदा प्रथमच भाजप समर्थित 1 संचालकांची एंट्री बाजार समितीमध्ये झाली. त्यामुळे मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार मागील पंचवार्षीक प्रमाणे एकहाती निर्णयाचा राहणार असून बाजार समितीमध्ये घेतल्या जाणाऱ्या निर्णयाचा विरोधही विरोधकांकडून केला जावू शकत नाही असे एकंदरीत चित्र दिसून येत आहे. त्यामुळे बाजार समिती सभापती व उपसभापतीपदी सक्षम उमेदवारांची निवड होणे गरजेचे आहे.
23 मे रोजी बाजार समिती पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभापती पद हे प्रतिष्टे असल्यामुळे या पदाचा कोण राहणार दावेदार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतांना मात्र, एका नावाची वर्तुळात चर्चा आहे. तेव्हा 23 मे 2023 रोजी सभापती व उपसभापती पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
23 मे रोजी मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींची निवड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 17, 2023
Rating:
