सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
आज ब्रिगेडियर शंतनू मयंकर वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या युनिटला भेट दिली.यावेळी छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, " ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी भाषिक न्यूनगंड बाळगू नये, आपल्या बोलीभाषेत पूर्ण आत्मविश्वासाने समाजातील प्रत्येक घटकाशी सुसंवाद साधावा,आपले व्यक्तिमत्व परिपूर्ण असण्यासाठी प्रयत्न करावे."
यावेळी कर्नल व्यंकट रत्नाम, सुभेदार मेजर रोहितास कुमार, महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ.मानसकुमार गुप्ता, राष्ट्रीय छात्र सेनेचे माजी अधिकारी डॉ. रवींद्र मत्ते, हवालदार पांडुरंग झोडे , राष्ट्रीय छात्र सेनेचे काळजीवाहू अधिकारी प्रा.किशन घोगरे हे मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमात अमरावती येथील आर.डी.सी.कॅम्पमध्ये निवड झाल्याबद्दल कोमल जांभुळकर हिचा आणि राष्ट्रीय छात्र सेनेची द्वितीय वर्षाची परीक्षा ए ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल वैष्णवी रामटेके हिचा ब्रिगेडियर शंतनू मयंकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन, प्रास्ताविक राष्ट्रीय छात्र सेनेचे काळजीवाहू अधिकारी प्रा.किशन घोगरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.गुलशन कुथे, प्रा.मनोज जंत्रे, दिनकर उरकुंडे,पंकज सोनटक्के, कार्तिक देशपांडे, संजय बिलोरिया,भदुसिंग वडते, गणेश लोणारे यांनी परिश्रम घेतले.
राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी जीवनात मोठे ध्येय बाळगावे-ब्रिगेडियर शंतनू मयंकर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 01, 2023
Rating:
