APMC Election Result 2023 : मारेगाव बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता, आमदार वामनराव कासावारांनी राखला गड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच बाजार समितीच्या निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने आपले वर्चस्व राखल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसने मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागा पैकी १७ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपाने एक खाते उघडले.

राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून अनेक जणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर ही पहिली गाव पातळीवरील प्रत्यक्षात शेतकरी सहभागी असणारी निवडणूक होती. त्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगावमध्ये सुद्धा ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. मात्र, या निवडणुकीमध्ये काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवली असून आमदार वामनराव कासावारांनी आपला गड पुन्हा राखला आहे.

मारेगाव शेतकरी एकता पॅनलने जिंकल्या सतरा जागा : मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला एक तर्फी वामनराव कासावार व माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या मारेगाव शेतकरी एकता पॅनलने १७ जागा जिंकून बाजार समितीवर सत्ता आणली आहे. यामध्ये विरोधक असणाऱ्या शेतकरी परिवर्तन पॅनलला एक जागा मिळवता आली. त्यांचा दारून पराभव झाला आहे.

काँग्रेस पुरस्कृत शेतकरी एकता पॅनल चे विजयी उमेदवार :

गौरी शंकर खुराणा, अरुणाताई खंडाळकर, वसंत आसूटकर, गणू थेरे, यादव काळे, जीवन काळे, काशिनाथ खडसे, ब्रम्हदेव जुनगरी, सुनीता मस्की, संतोष मडावी, रमण डोये, प्रफुल विखणकर, विजय अवताडे, महादेव सारवे, देविदास बोबडे, भास्कर धांडे यांचा समावेश आहे.



APMC Election Result 2023 : मारेगाव बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता, आमदार वामनराव कासावारांनी राखला गड APMC Election Result 2023 : मारेगाव बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता, आमदार वामनराव कासावारांनी राखला गड Reviewed by सह्याद्री चौफेर on April 30, 2023 Rating: 5
Powered by Blogger.