सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
माजी नगरसेवक तथा चापली रिपवाटिकेचे संचालक राजू तुराणकर हे नेहमीप्रमाणे आपल्या नर्सरीवरून घरी दहा वाजता परतले, त्यांनी आपली महिंद्रा बेलोरो (एम एच 31 सी एस 7900) हे वाहन घरा समोर उभे केली होती. दरम्यान कालपासून अवकाळी पावसाचे थैमान सुरु असल्याचा फायदा घेत अज्ञात इसमानी गाडी च्या काचा फोडल्या व ज्वलंनशील पदार्थ झोकून बेलोरा गाडीला पेटवून दिले. दरम्यान, वाहनाच्या काचा फुटत असल्याचा आवाज त्यांना गेला, परंतु पाऊस सुरु असल्यामुळे त्यांना विजेचा आवाज असावा म्हणून दुर्लक्ष केले. मात्र धूर उडल्याने व काचेचा आवाज जोराने घुमल्याने आजूबाजूला वास्तव्यास राहणारे लोकं जागी झाले. तेव्हा गाडी पेटत असल्याचे निदर्शनास आले. अशातच घरची मंडळी उठली, आजूबाजूला असणाऱ्यांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेत गाडी विझवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, पोलीस घटनास्थळी दाखल होऊन सदर घटनेचा पंचनामा केला. व अज्ञात इसमाविरोधात तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवाण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलीस करित आहे.
शहरातील भरवस्तीत घडलेल्या या जाळपोळीच्या घटनेने स्थानिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे दहशत माजविणारे हे राजु तूराणकर यांच्यावर भ्याड हल्याचा प्रयत्न असावा असा संशय व्यक्त केला जात असून अशी खमंग चर्चा शहरात आहे.
अज्ञातांनी पेटवली माजी नगरसेवकाची गाडी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 30, 2023
Rating:
