सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ याची प्रयागराजमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. प्रयागराज येथील मेडिकल कॉलेजला नेण्यात येत असतानाच या दोघांवर गोळीबार करण्यात आला.
पहा कोण होता अतिक अहेमद
अतिक अहेमद हा उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहराचा होता, वयाच्या सतराव्या वर्षीच त्याने एकाची हत्त्या करून गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवले. त्यानंतर त्याने सुरक्षित राहण्यासाठी राजकारणात पाऊल ठेवले व १९९१ ते २००४ पर्यंत निवडणूकही लढवली.
नंतर २०१७ मध्ये दहशत माजवणे, धमकावणे आणि तोडफोड केल्याप्रकरणी यूपी पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली. मात्र आता त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन जात असताना गोळीबार करून ठार कारणात आले.
मोठी बातमी! उत्तरप्रदेशच्या सर्व जिल्ह्यामध्ये कलम १४४ लागू, इंटरनेट सेवा हि बंद
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 16, 2023
Rating:
