सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : पंचायत समिती मारेगाव अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथ. शाळा,पहापळ तथा शाळा व्यवस्थापन समिती,पहापळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९ वा. येथील जिल्हा परिषद प्राथ. शाळेच्या भव्य पटांगणामध्ये महिला प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री.किशोर गज्जलवार साहेब, गटविकास अधिकारी पं स मारेगाव, हे असणार आहे. तर अध्यक्ष म्हणून सौ.रेणुका देशपांडे जेष्ठ समाज सेविका ह्या आहे.
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक सुनीता बेरड (पेचे), अधीक्षक, डॉ. सपना केलोडे, (मारेगाव) तसेच प्रमुख अतिथी डॉ. अर्चना देठे,(तालुका आरोग्य अधिकारी मारेगाव), सौ. जया मोरे, (मा. बालविकास अधिकारी मारेगाव), कु. प्रेमीला सिडाम, (वनरक्षक मारेगाव), सौ. पद्मा कनाके अंगणवाडी पर्यवेक्षिका मारेगाव, विशेष उपस्थिती नरेंद्रजी कांडूरवार गट शिक्षणाधिकारी पं.स.मारेगाव, श्री जानरावजी शेडमाके, विस्तार अधिकारी, पं.स.मारेगाव ह्यांची उपस्थिती लाभणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल गुरुनुले, मुख्यध्यापक एन. टी. चौधरी, उपाध्यक्ष शा. व्यवस्थापन समिती सौ शितल भोयर, सरपंच राहुल आत्राम, ग्रामसेविका सौ दर्शना मेश्राम, अंगणवाडी सेविका सौ कल्पना आत्राम, आरोग्य सेविका उपकेंद्र यवतमाळ सौ वंदना पुसदेकर, आदी मान्यवरांच्या उपस्थीत मार्गदर्शनपर सुसंपन्न होणार आहेत.
या मेळाव्याला सर्वांनी उपस्थितीत राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे,आवाहन ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच तथा सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, तसेच सर्व महिला बचत गट सदस्य, सर्व महिला मंडळ, माजी विद्यार्थीनी व शिक्षक वृंद, पहापळ यांनी केले आहे.
पहापळ येथे महिला प्रबोधन मेळाव्याचे आयोजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 17, 2023
Rating:
