डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गंगाधर लोणसावळे महाराज यांना संविधान पुस्तिका भेट देऊन केला सत्कार

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती चे औचित्य साधून नरसाळा येथील बौद्ध विहारात गंगाधर महाराज यांच्या सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम दुपारी 2. वाजता आयोजित करण्यात आला होता.
क्रांती सूर्य बिरसामुंडा बहुउद्देशी संस्था मारेगाव व MCED यवतमाळ यांच्या संयुक्त विद्दमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नरसाळा येथे आदिवासी युवती-महिला 18 ते 45 वयोगटातील महिलांना शिवणकलेचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यांना याच कार्यक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्याचे सुद्धा आयोजन होते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त असल्याने कार्यक्रमांची सुरुवात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारत रत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
क्रांती सूर्य बिरसा मुंडा बहुउद्देशीय संस्था मारेगावचे अध्यक्ष रामदासजी आत्राम यांनी संस्थेच्या वतीने आदिवासी कोलाम संघटनेचे सल्लागार, गुरुकुंज मोजरी चे मध्यवर्ती प्रतिनिधी, गुरुदेव सेवा मंडळाचे मारेगाव तालुका किर्तनकार व प्रबोधनकार गंगाधर लोणसावळे महाराज यांना शाल व संविधान पुस्तिका भेट देऊन सत्कार करण्यात आला.
ज्या युवती-महिलांनी शिवणकलेचे प्रशिक्षण पूर्ण केलेत त्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. गंगाधर महाराज यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमूल्य कार्याचा सखोल प्रकाश टाकून उपस्थिताचे मन सुन्न केलीत. संस्थेचे अध्यक्ष यांनी आपल्या भाषणातून आदिवासी युवती-महिलांनी समोर येवून रोजगाराचे अनेक मार्ग आहेत. पण मार्गदर्शन मिळत नसल्याने तुम्ही कुटुंबासाठी काहीही करू शकत नाहीत, पण आम्हची संस्था अशा गोरगरीब महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून जगण्याचा मार्ग दाखवितात यांचा फायदा घेण्याचे यावेळी आव्हान केलेत.
या कार्यक्रमाला गावातील तसेच पर बाहेरील गावच्या महिलाही उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते सुभाष सफरे (डोल डोंगरगाव),
पुंडलिकराव गाडगे महाराज (किर्तनकार) हिवरा मजरा, गोविंदा सुर्तेकर गुरुदेव सेवा मंडळ नरसाळा, प्रभाकर वाटेकर गुरुदेव सेवा मंडळ नरसाळा, अनंता सुर्तेकर, गायक तथा तबला वादक नरसाळा, तुळशीराम राजगडकर, गायक, पंचरंगी कलाकार नरसाळा, प्रमाणपत्र धारक महिला रूपा शंकर परचाके करणवाडी, शामकला चक्रधर लोणसावळे सालेभाट्टी, अनुसया गणेश लोणसावळे,साल्लेभट्टी व इतरही बऱ्याच महिला उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कैलास दूधकोहळे यांनी करून कार्यक्रमांची सांगता केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गंगाधर लोणसावळे महाराज यांना संविधान पुस्तिका भेट देऊन केला सत्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गंगाधर लोणसावळे महाराज यांना संविधान पुस्तिका भेट देऊन केला सत्कार Reviewed by सह्याद्री चौफेर on April 16, 2023 Rating: 5
Powered by Blogger.