वेळाबाई येथे मिलिंद एज्युकेशन सोसायटी तर्फे 'अभिवादन सभा'चे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : अ‍ॅड.अशोकरावजी मानकर यांचे व्दितीय स्मृती दिना निमित्ताने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या "स्मृतिशेष" दिनानिमित्ताने मिलिंद एज्युकेशन सोसायटी, वेळाबाई द्वारा आयोजित नालंदा विद्यालय येथे दि.18 एप्रिल 2023 रोजी मंगळवारला सकाळी 9. वाजता संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री अ‍ॅड. देविदासजी काळे, अध्यक्ष श्री रंगनाथ स्वामी नागरी सह. पतसंस्था, वणी, तर विशेष अतिथी म्हणून श्री.विश्वास नांदेकर, माजी आमदार वणी विधानसभा क्षेत्र, मा. अ‍ॅड. सत्यविजय उराडे, चंद्रपूर, श्री. खुशालराव तेलंग, आंबेडकरी कार्यकर्ते, चंद्रपूर, श्री. गौतमराव मानकर, नवनियुक्त अध्यक्ष मिलिंद एज्यू. सो. वेळाबाई, श्री महादेवरावजी भगत, कोषाध्यक्ष व कार्यकारी सचिव, मिलिंद एज्यू.सो. वेळाबाई यांची उपस्थित राहणार आहेत. 
तरी या अभिवादन सभेत परिसरातील तमाम नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मिलिंद एज्युकेशन सोसायटी, वेळाबाई, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी नालंदा विद्यालय, तसेच वेळाबाई आजी-माजी विद्यार्थी व ग्रामवासी, वेळाबाई तर्फे करण्यात आले आहे.



वेळाबाई येथे मिलिंद एज्युकेशन सोसायटी तर्फे 'अभिवादन सभा'चे आयोजन वेळाबाई येथे मिलिंद एज्युकेशन सोसायटी तर्फे 'अभिवादन सभा'चे आयोजन Reviewed by सह्याद्री चौफेर on April 16, 2023 Rating: 5
Powered by Blogger.