ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली, महागाई च्या भडक्याने घर खर्चाचे बजेट कोलमडले

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये स्वयंपाक करण्यासाठी पुन्हा चुली पेटत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ग्रामीण भागातील महिला आता पुन्हा चुलीकडे वळल्या आहेत. ग्रामीण भागात उज्वला गॅस योजने अंतर्गत गॅस जोडणी देण्यात आल्यावर चुलीचा वापर कमी झाला होता. परंतु सिलेंडरचे दर भडकताच,आता एवढे बजेट आणायचे कुठून हा प्रश्न मजूर वर्ग महिला समोर निर्माण झाल्याने आपली चूलच बरी म्हणत चूली पेटायला लागल्या आहे. त्यामुळे महागाई च्या सतत च्या भडक्याने महिलांचे घर खर्चाचे बजेट डगमगले.

मागील वर्षा पासून गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भीडत उमटत आहे. आहे. या वाढत्या महागाई व गॅस दराची झळ सामान्य कुटुंबाला बसत आहे. मजुरांच्या घरातील घर खर्चाचे बजेट कोलमडत असून, काही भागात तर मिळत असलेल्या फ्री धान्य विकून घरातील तेल मीठ सारख्या गरजा कशा बशा भागवने चालू आहे. परिस्थिती नाजूक असतांना गेल्या काही  महिन्यामध्ये हाताला काम पण नाही, मग मोलमजुरी नसल्याने घर चालवायचे कसे? अशी चिंता कुटुंब प्रमुखांना असतांना दुःख सांगावे कोणाला, असा नाराजीचा सुर महिला वर्गातून उमटत आहे.
ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली, महागाई च्या भडक्याने घर खर्चाचे बजेट कोलमडले ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली, महागाई च्या भडक्याने  घर खर्चाचे बजेट कोलमडले Reviewed by सह्याद्री चौफेर on April 28, 2023 Rating: 5
Powered by Blogger.