सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यासह शिवणाळा उमरीपोड येथे बुधवारी अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला. त्यामुळे वादळ पाऊस वाऱ्याने येथील सुशिला बुतू जुनघरे (33) या निराधार महिलेच्या घरावरील छत पूर्णतः उडून गेले असून ती सध्या बेघर झाली आहे.
परिणामी तालुक्यात रोजच्या होणाऱ्या वादळ पाऊस वाऱ्यामुळे हे जुनगरी कुटुंब भितीखाली वावरत आहेत. दि.26 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसाचा जोरदार फटका तालुक्याला बसला असताना यात शिवणाळा (उमरीपोड) येथील सुशीला जुनघरे यांच्या राहत्या घराचे छत्र आकांताने हरवले आहे. यात घरातील जीवनाशक्य वस्तू, कपडे त्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. महिलेच्या कुटुंबात दोन मुले व ती स्वतः राहते. तसेच सदर महिला ही निराधार आहे.
गेल्या काही दिवसापासून तालुक्यात अवकाळी पावसाने वादळ वाऱ्याने थैमान घातले आहे. रोज काहींना काही घटना माध्यमातून समोर येत आहे. विशेष म्हणजे विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होत असून काही ठिकाणी वीज पडत असल्याने या निराधार महिलेला प्रशासनाच्या तात्काळ मदतीची अत्यंत गरज असून संबंधित विभाग व स्थानिक प्रशासन घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परंतु सुशीला ला शासनाच्या तात्काळ मदत मिळावी अशी आर्तहाक आहे.
महाराष्ट्र् राज्य आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार तरतुदी नुसार आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षितेची जबाबदारी ही संबंधित तालुका व जिल्हा व्यवस्थापन विभागाची आहे. त्या अनुषंगाने सदर घटनांना शह देण्यासाठी आपआपल्या परीने विभाग अधिकारी व कर्मचारी तसेच राजकीय प्रतीनिधी यांची जबाबदारी पाडली पाहिजे. असा सूर सदरील घटनास्थळी झालेल्या नुकसानीकडे पाहता म्हणता येईल. अशावेळी नुकसानग्रस्त कुटुंबाला लवकरात लवकर शासनाची मदत मिळावी हिच अपेक्षा.- गंगाधर लोणसावळे महाराजसालेभट्टी ता. मारेगाव
त्या निराधार महिलेचे घरावरील छत वादळ वाऱ्याने उडाले
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 28, 2023
Rating:
