सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे आज शुक्रवारी झालेल्या निवडणुकांचे निकाल रात्री उशिरा जाहीर झाले. त्यात शेतकरी एकता पॅनलने 18 पैकी 14 जागांवर दणदणीत विजय मिळावीत बाजार समितीत सत्ता काबीज केली. या बाजार समितीच्या निवडणुकीत 94 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 36 अधिकृत तर दोन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी सहकारी संस्था गटातील 10 व ग्रामपंचात गटातील 4 जागांवर भाजप समर्थित शेतकरी एकता पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळविला. तर व्यापारी अडते व हमाल गटातील तिन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. सहकार संस्था गटातील आरक्षित जागेवर महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून आला.
भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत या बाजार समितीच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. अॅड. विनायक एकरे यांच्या नेतृत्वात शेतकरी एकता पॅनल तर, माजी आमदार वामनराव कासावार व माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात शेतकरी परिवर्तन पॅनलचे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. यात शेतकरी एकता पॅनलचे उमेदवार सरस ठरले. त्यांनी एकहाती विजय मिळविला. या विजयाचे पडसाद अन्य निवडणूकीवर पडतील अशा ही चर्चा रंगू लागल्या आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये सहकारी संस्था गटातील शेतकरी एकता पॅनलचे अॅड. विनायक एकरे, नितीन पानघाटे, प्रभाकर बोढे, दिलीप बोढाले, मंगल बलकी, मोहन वरारकर, अशोक पिदूरकर, वेनूदास काळे, मीरा पोतराजे, वैशाली राजूरकर व शेतकरी परिवर्तन पॅनलचे प्रमोद वासेकर, यांचा तर ग्रामपंचायत गटातील उमेदवारांमध्ये शेतकरी एकता पॅनलचे विजय गारघाटे, प्रकाश बोबडे, चंद्रकांत हिकरे, हेमंत गौरकार यांचा तसेच व्यापारी अडते व हमाल गटातील उमेदवारांमध्ये शेतकरी परिवर्तन पॅनलचे सतिश बडघरे, रवींद्र कोंगरे, प्रमोद सोनटक्के यांचा समावेश आहे.
महाविकास आघाडतील अंतर्गत धुसपूस पराभवासकारणीभूत ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून ऐकायला मिळत होती. महाविकास आघाडी पासून राष्ट्रवादी दूर राहिली. घटक पक्षही महाविकास घडतीत दिसून आले नाही. शेतकरी संघटनांनाही सोबत घेण्यात आले नाही. अनुभवी नेत्यांना दूर ठेवण्यात आले. काँग्रेस व सेना (ठाकरे) गटानेच महाविकास आघाडीच्या सीट वाटप करून निवडणूक लढविली. त्यामुळे महाविकास आघाडीशी संबंधित असलेले त्यांचे खंदे समर्थक नाराज दिसून येत होते. ही नाराजीच विजयला भोवल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांमधून ऐकायला मिळत होती. रणनीतीकार, राजकीय धुरंधर व अनुभवी राजकारणी समजल्या जाणाऱ्या दोन माजी आमदारांच्या पॅनलला पराभवाचा सामना करावा लागल्याने हा पुढील वाटचालीकरता मोठा धक्का मानला जात आहे. दोन्ही राजकीय नेत्यांच्या संगठनाचा अभाव या निवडणुकीत दिसून आला. आपापसातील समन्वयाच्या अभावामुळे महाविकास आघाडीला पराभवाची चव चाखावी लागल्याच्या चर्चा आता शहरात रंगू लागल्या आहेत.
भाजपा पुरस्कृत शेतकरी एकता पॅनलचा दणदणीत विजय
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 29, 2023
Rating:
