सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : येथील एस. पी.एम विद्यालयात दिनांक 26 एप्रिल ते 3 मे 2023 पर्यंत बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना व कलागुणांना वाव देण्याकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सकाळी सात ते दहा या दरम्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात शालेय प्रार्थना, प्राणायाम कराटे प्रशिक्षण व इतर विषयाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना संबंधित विषयाचे शिक्षक करतात. यात गीत गायन वाचन प्रेरणा अभियान लेखन कौशल्य सामान्य ज्ञान व विद्यार्थ्यांमधील कलाविष्कार सादर करण्यात येतो, या शिबिराचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री क्षीरसागर सर व विद्यालयाचे उपमुख्याध्यापक माननीय श्री तामगाडगे सर यांच्या हस्ते 26 एप्रिल रोजी करण्यात आले शालेय प्रार्थना व योगासना श्री बुजुरे सर यांनी सादर केली सिंग मॅडम यांनी विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षण दिले तर बिडकर मॅडम आणि बिडकर सर यांच्या चमुचे सहकार्य लाभले.
मेश्राम मॅडम यांनी विद्यार्थ्यांना संगीताचे धडे दिले. गारघाटे,सर, चिडे मॅडम, कनाके मॅडम,कचवे मॅडम,नवघरे मॅडम, आस्कर सर,धकाते सर, राजगडकर मॅडम, पडलवार सर, निमकर सर, मडावी सर, गादेवार मॅडम, आसुटकर सर, बुजुरे सर यांनी मुलांना वेगवेगळ्या विषयाचे धडे दिले. दरम्यान मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांना नाश्ता दिला जातं असे, या शिबिरासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.
एस.पी.एम विद्यालयात बालसंस्कार शिबिराचे आयोजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 29, 2023
Rating:
