टॉप बातम्या

मारेगाव महसूल विभागाची दोन ट्रॅक्टर वर कारवाई

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील कोसारा सावंगी पात्रातून अवैधरित्या वाळु चोरून घेवून जाणाऱ्या 2 ट्रॅक्टर चालकाला महसूल विभागाने पकडले. ही कारवाई 26 एप्रिल रोजी सकाळी करण्यात आली.

शासनाने नवीन धोरण आणल्यानमुळे वाळूची चोरटी वाहतूक जोमात सुरु असल्याने याला आळा घालण्यासाठी महसूल विभाग गेल्या काही दिवसापासून ऍक्शन मोडवर दिसत आहे. बुधवारी 11 वाजेच्या सुमारास विना नंबर चे दोन ट्रॅक्टर अवैधरित्या वाळु चोरून घेवून जात असतांना आढळून आले असता मारेगाव नायब तहसीलदार किशोर यादव हे आपल्या पथकासह कोसारा सावंगी परिसरात गस्तीवर असतांना यांनी पकडले.

कारवाई दरम्यान,2 ट्रॅक्टर पैकी एका ट्रॅक्टर ने पोबारा केला अशी माहिती आहे. त्याचे विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. तर एक मुद्देमालसह महसूल विभागाने जप्त केले. 

Previous Post Next Post