बाजार समितीत परिवर्तन तेजीत, यंदा गुलाल आपलाच..!!


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : होऊ घातलेल्या मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अगदी अंतिम टप्प्यात आली आहे. या अनुषंगाने दोन्ही पॅनल कडून यंदा गुलाल आपलाच म्हणत सभा बैठाका, चर्चा, 'या ना त्या' निमित्ताने कार्यक्रमात पुढाकार दर्शविणे सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. सहकार क्षेत्रात कायम काँग्रेस ची पकड असतांना यात बीजेपी पुरस्कृत सर्वसामान्य उमेदवार उतरवल्याने आता पक्षश्रेष्टीना विजय मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार. किंबहुना सत्ताधारी व विरोधक यांच्यात "काटे की टक्कर" होण्याचे संकेत वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

या बाजार समिती च्या निवडणुकीत माजी आमदार व माजी सभापती, यांच्या गटाने बहुमतावर निवडुन आणण्याचे रणनीती अखण्यासाठी रणशिंग फुंकले. तर याच निवडणुकीमध्ये आ. संजीवरेड्डी बोदकूरवार, अनिल देरकर व विशाल किन्हेकार यांनी सुद्धा आपले उमेदवार निवडुन कसे आणता येईल यासाठी तेही नियोजन पूर्ण व्हिजिट देत आहे. पण मात्र, यात असंतुष्ट झालेल्या उमेदवारांची भूमिका काय असणार याकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहेत.

मारेगाव तालुक्यात माजी सभापती नरेंद्र पा. ठाकरे यांच्या आशिर्वादाशिवाय या खुर्चीचा मानकरी ठरणार नाही. अशी वर्तुळात चर्चा आहे. ते कोणाला आशीर्वाद देतील हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. तसेच आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या भाजपा समर्थीत शेतकरी परिवर्तन पॅनल मध्ये कोण होणार सभापती याबाबत अनिश्चितता कायम आहे.

दरम्यान, निवकडणुकीचे दिवस जवळ येत असल्याने परस्परात धाकधूक वाढली असून, मा आ. बोदकुरवार समर्थित मतदारांना पसंती दिली जात असल्याचे वर्तुळात चर्चा आहे. तर विरोधकांच्या वतीने हि बाजार समिती ताब्यात घेण्याकरीता मोठे प्रयत्न केले जात आहे. 

शेवटी "विजयी होणारं निवडणूक येणारं होऊद्या किती बी काय... यंदा गुलाल आपलाच हाय... यंदा धुराळा आपलाच हाय" असे जरी असले तरी निकालाअंती सारं चित्र स्पष्ट होणार आहे. 
बाजार समितीत परिवर्तन तेजीत, यंदा गुलाल आपलाच..!! बाजार समितीत परिवर्तन तेजीत, यंदा गुलाल आपलाच..!! Reviewed by सह्याद्री चौफेर on April 27, 2023 Rating: 5
Powered by Blogger.