मारेगावात वंचित बहुजन आघाडी तर्फे पाणपोई सुरु

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील वंचित बहुजन आघाडी तर्फे गरजू नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समिती मारेगाव मेन रोड परिसरात पाणपोई सुरु करण्यात आली आहे.

पाणपोईचे उदघाटन तालुका अध्यक्ष गौतम दारुंडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव नेहारे, म्हणाले की यावर्षी उष्णता खूप जास्त आहे, बाजारात येणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे. या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. परंतु श्री. संदीप आस्वले यांनी ही बाब लक्षात घेऊन पाणपोई करिता सहकार्य केले आहे. अनेक नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

वंचित बहुजन आघाडी च्या वतीने दरम्यान, मान्यवरांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष गौतम दारुंडे, उपाध्यक्ष संजय जिवने, मोरेश्वर लभाने, गोरखनाथ पाटिल, विठ्ठलराव नेहारे साहेब, अनंता खाडे, दिनेश करलुके, अनंतराव गोवर्धन, कुमार अमोल कुमरे यांची उपस्थिती होती. 

मारेगावात वंचित बहुजन आघाडी तर्फे पाणपोई सुरु मारेगावात वंचित बहुजन आघाडी तर्फे पाणपोई सुरु  Reviewed by सह्याद्री चौफेर on April 24, 2023 Rating: 5
Powered by Blogger.