सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
राळेगाव : 14 एप्रिल रोजी सर्वत्र भीमजयंती साजरी होत असतांना तालुक्याच्या शेवट च्या टोकावर वसलेल्या मौजा खैरी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची परवानगी नाकारल्याने आंबेडकरी अनुयायात नाराजीचा सूर उमटला असून येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झालीच पाहिजे व त्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी बौद्ध व बहुजन समाजाच्या वतीने करण्यात आली.
जयंती दिनी शोभायात्रा व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे. मात्र,कार्यक्रमास परवानगी देण्याबाबत 2 महिन्यांपासून ठाणेदार, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवदेन देऊन पाठपुरावा करीत आहेत. मात्र, आजपावेतो आम्हाला परवानगी देण्यात आली नाही. अशी तक्रार खैरी वशियांनी केली आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटले असता "मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची परवानगी नाकारत आहे. तुम्ही शेजारच्या गावात जाऊन जयंती साजरी करा," असे सांगितल्याने येथील आंबेडकरी अनुयायांच्या जिव्हारी लागल्याने समाजाच्या भावना भडकल्या जात असल्याचे बोलल्या जात आहे.
मागील 2001 या काळात श्री. मुकद खैरे यांचा कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमात एका मनोरुग्ण व्यक्तीने दगड मारल्याने कार्यक्रमाची सुव्यवस्था बिघडली होती. तोच विषय घेऊन आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात या घटनेचा 14 एप्रिल आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाशी काहीही संबंध नसल्याचे निवेदनात नमूद आहे. परिणामी खैरीत संतापाची लाट असून वडकी पोलीस स्टेशन समोर उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याचे सांगितलं जात आहे.
खैरी येथील सर्व 'बहुजन समाज व बौध्द समाज हा एकोप्याने व सलोख्याने राहात असताना येथे रामनवमी, हनुमान जयंती इत्यादी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. शिवाय कायदा व सुव्यवस्थेचे पालनही केले जातात. मात्र, भारतरत्न डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रम होऊ नये, असे षडयंत्र केल्या जात असल्याने येथील समस्त आंबेडकरी अनुयायांच्या भावना भडकवल्या जात असून, अवघ्या एक दिवसांवर असल्यामुळे गावात महामानव भारतरत्न डॉ आंबेडकर यांची जयंती साजरी झालीच पाहिजे व त्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची परवानगी नाकारली
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 13, 2023
Rating:
