महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समजून घेतले नगरपालिकेचे कामकाज

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : लोकमान्य टिळक महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांना वणी नगरपरिषदेचे कामकाज कश्या पद्धतीने चालतात नागरिकांच्या समस्या कश्या पद्धतीने सोडविण्यात येतात रस्ते, नाली, दिवाबत्ती, पाणी,बगीचा,स्वच्छता अश्या एक ना अनेक प्रश्नांची माहिती विद्यार्थ्यांना नागरपरिषदेला भेट दिल्यावर कळली.
विद्यार्थ्यांचा हा अभ्यास दौरा होता राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ विकास जुनगरी यांच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावरील संस्थेच्या कामकाजाची इत्यंभूत माहिती मिळावी यासाठी त्यांनी उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांची भेट घेतली. या भेटीत उपमुख्याधिकारी यांनी नगरपलिकेतील बांधकाम विभाग,नियोजन विभाग,आरोग्य विभाग, विद्युत विभाग याव्यतिरिक्त अनेक विभागांना विद्यार्थ्यांना सोबत घेऊन भेटी दिल्या.
यावेळी प्रत्येक विभागाचे कामकाज कश्या पद्धतीने चालतात याची माहिती त्यांनी दिली तसेच वेगवेगळ्या समित्यांची माहितीसुद्धा यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री अभिजित वायकोस यांनी विद्यार्थ्यांना नगरपालिकेची माहिती देऊन प्रशासकिय सेवेत कशा पद्धतीने आपण येऊ शकता याची माहिती दिली.
प्रशासक तहसीलदार निखिल धुळदर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले प्राचार्य प्रसाद खानझोडे यांचे या अभ्यास दौऱ्याकरिता मार्गदर्शन लाभले, यावेळेस बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शविली.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समजून घेतले नगरपालिकेचे कामकाज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समजून घेतले नगरपालिकेचे कामकाज Reviewed by सह्याद्री चौफेर on April 13, 2023 Rating: 5
Powered by Blogger.