सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : मारेगाव बाजार समितीत शेतक-यांचे प्रश्न सोडवतील असेच उमेदवार भाजपा तर्फे देण्यात आले असुन, मतदारांनी बाजार समितीत घराणेशाहीला थारा देऊ नका त्यांचा पराभव करण्याचे अवाहन भाजपाचे लोकप्रिय विकासपुरुष आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी केले आहे.
कृषी उपन्न बाजार समितीच्या सार्वत्रीक निवडणुक भाजपा-शिंदे (गट) पुरस्कृत 'शेतकरी परिवर्तन पॅनल' प्रचार नारळ श्रीक्षेत्र वनोजा देवी (जनामाय कासामाय) येथे शुक्रवारी (21 एप्रिल) ला फोडण्यात आला. या कार्यक्रमाला लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, अनिल देरकर, शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष विशाल किन्हेकर, शंकर लालसरे, बोबडे गुरुजी, शशिकांत आंबटकर, प्रदीप डाहुले, जगदीश ठेंगणे, राहुल राठोड, चंद्रकांत धोबे, वैभव पवार, पवन ढवस, प्रशांत नांदे, जयंता लांबट, प्रवीण बोथले, मारोती तुराणकर, रमेश चिकटे, सुनीता पांढरे, गणेश झाडे, गोवर्धन तोडासे, प्रसाद ढवस, प्रशांत भंडारी, प्रविण भट, चौधरी, विशाल गाडगे, प्रमोद आञाम, मारोती राजुरकर, गणपत वऱ्हाटे, गजानन चिंचोलकर,प्रसाद झाडे, शेखर चिंचुलकर, प्रमोद ताजणे, महाजन भाऊ, आदी भाजपा शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मतदार उपस्थित होते.
उमेदवारांनी करून दिला परिचय
भाजपा-शिंदे गट पुरस्कृत तर्फे 'शेतकरी परिवर्तन पॅनल' सर्व साधारण सहकारी संस्था मत. संघा मधुन जयवंत ठेपाले, बंडू डाहुले, जीवन डाखरे, शरद ताजणे, रमेश लसणे, प्रवीण लोहे, प्रवीण बोबडे, सर्व साधारण महिला प्रतिनिधी सौ सुरेखा खंगार, अनुसूचित जमाती मनोहर गेडाम, इतर मागासवर्गीय भास्कर दानखेडे, ग्रामपंचायत गट सर्वसाधारण मधून ज्ञानेश्वर चिकटे, सुरेश लांडे, आर्थिक दुर्बल घटक अविनाश लांबट, व्यापारी -अडते संजय काळे, अजय भंसाळी, हमाल-मापारी विजय डोंगरकर यांनी परिचय करून दिला.
बाजार समिती निवडणूक आमदार संजीवरेड्डी बोदकूरवारांसाठी प्रतिष्ठेची
आगामी लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर असतांना मारेगाव बाजार समितीची निवडणूक आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्यासाठी अत्यंत महत्वाची असणार आहे. या निमित्ताने संजीवरेड्डी बोदकूरवारांची देखील प्रतिष्ठापणाला लागणार आहे. आधीच त्यांच्या बद्दल जनतेत "कही खुशी कही गम" असतांना आमदार बोदकूरवारांनी खेचून आणलेल्या विकासकामाची पोचपावती मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत या निमित्ताने देतील का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
बाजार समितीत घराणेशाहीला थारा देवू नका - आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 22, 2023
Rating:
