महागाव तालुक्याला वादळीवाऱ्यासह गारपिठाचा बसला तडाखा

सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के

माहागाव : तालुक्यात अवकाळी वादळी वऱ्यांसह पावसाने जोरदार थैमान घातले असून कासार-बेहळ, वरोडी, सेवा नगर येथे गारपिठासह अवकाळी पावसाने घरांचे,शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

जगाच्या पोशिंदयाच्या तोंडाशी आलेला घास ज्वारी, तीळ यांचे मोठे नुकसान झाले आहे. सेवा नगर येथील परसराम आला राठोड यांच्या बैलाला सोसाट्याचा वाऱ्या मुळे टिन पत्रे उडून त्यांच्या बैलाला इजा पोहचली व वरोडी येथील देवानंद अडकिने यांची म्हैस जागीच ठार झाली.

21 एप्रिल रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजता दरम्यान, अचानक आलेल्या वादळी पावसामुळे व गारपिठीमुळे महागाव तालुक्यातील सेवा नगर, कासारबेहळ व वरोडी येथील शेतकऱ्यांची पुरती ताराबळ ऊडाली व या वादळी वाऱ्यात शेतकऱ्यांचे ज्वारी हे पीक जमिनदोस्त झाली असून अनेक गांव परिसर या वादळा ने प्रभावित झाल्याचे चित्र असून शासन व प्रशासन यांनी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
माध्यमातून शेतकऱ्यांची मागणी 


महागाव तालुक्याला वादळीवाऱ्यासह गारपिठाचा बसला तडाखा महागाव तालुक्याला वादळीवाऱ्यासह गारपिठाचा बसला तडाखा Reviewed by सह्याद्री चौफेर on April 22, 2023 Rating: 5
Powered by Blogger.