हेमराज कळंबे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

   
सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : दि.20/04/2023 ला वसंतराव नाईक सभागृह जि. प. यवतमाळ येथे सन 2020-21 व सन 2021-22 चा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या द्वारे आयोजित करण्यात आला.

यात जि. प. शाळा धामणी पंचायत समिती मारेगाव येथील ओबिसी जनजागृती समितीचे सदस्य, उत्कृष्ट वक्ता, उपक्रमशील शिक्षक, गुरुदेव सेवक, उत्कृष्ट खेळाडू, अनेक क्षेत्रात योगदान असलेले हेमराज गणेश कळंबे सर यांचा सन 2021-22 च्याआदर्श शिक्षक पुरस्काराने मा. अमोल येडगे जिल्हाधिकारी व डॉ. श्रीकृष्ण पांचाळ मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. यवतमाळ यांच्या हस्ते शाल श्रीफळ मोमेंटम,व प्रमाणपत्र देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला.
हेमराज कळंबे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित हेमराज कळंबे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित   Reviewed by सह्याद्री चौफेर on April 21, 2023 Rating: 5
Powered by Blogger.