सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : मागील वर्षीच्या खरीप हंगामातील पिकाचा विमा केन्द्र शासन व राज्य शासनाच्या हिश्यासह शेतकर्यांनी विमा कंपनीकडे काढला. मात्र, विमा कंपनीने शेतकर्याना ३३ टक्के रक्कम काही शेतकऱ्यांना अदा केली, परंतु शेतकऱ्यांना शंभर टक्के विम्याची रक्कम मिळावी यासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी शेतकऱ्यासह मारेगाव तहसिलदार यांना निवेदन देऊन येत्या १७ एप्रील पर्यंत उर्वरीत विम्याची रक्कम न मिळाल्यास उपोषण करू असा इशारा दिला होता, त्या अनुषंगाने आज दि.१७ एप्रिल रोजी मारेगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
जेव्हा जेव्हा शेतकरी, सर्वसामान्य लोकांचा विषय असतो त्यावेळी संभाजी ब्रिगेड हे नेहमीच पुढाकार घेऊन जगाच्या पोशिंद्याला न्याय देण्यासाठी तत्पर असते. विशेष उल्लेखनीय की, अतिवृष्टी, सतत ची नापिकी, कर्जबाजारी, शेत मालाला भाव न मिळणे, सावकारी या चक्रव्यूहात बळीराजा फसला जात असून, शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा, हक्काचा विषय घेऊन संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष अजय भाऊ धोबे यांनी पंतप्रधान पिक विमा योजना २०२२ - २०२३ चा उर्वरित शंभर टक्के लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी आज सोमवारी तहसील कार्यालयासमोर तंबू गाडून उपोषणाला सुरुवात केली, या उपोषणास अखिल भारतीय सरपंच परिषदेचा जाहीर पाठिंबा मिळाला.
त्याआधीच संभाजी ब्रिगेड ने प्रशासनाला निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा दिला होता. दरम्यान तहसीलदार साहेब, निवडणूक नायब तहसीलदार श्री यादव साहेब व तालुका कृषी अधिकारी एस. के निकाळजे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्ते समक्ष विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनीधी श्री रामेश्वर थोरे यांचे सोबत भ्रमण द्वारे चर्चा घडवून आणली. यावेळी (ACT) कृषी विमा कंपनीचे तालुका प्रतिनीधी गैरहजर होते. दोन दिवसात या बाबीचा निवाडा लावावा लेखी सूचित करून तहसील कार्यालयात १८ ते १९ एप्रिल ला स्वतः हजर राहून शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून त्यावर सुनावणी घेण्याचे संबंधितानी मान्य केले.
परिणामी कृषी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनीधी पुढील दोन दिवसात म्हणजेच दि. १८ ते १९ एप्रिल २०१३ ला हजर न झाल्यास त्यांचेवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी, तसेच शेतकरी दाखल करतील. या लेखी आश्वासनानुसार उपोषणकर्त्यांनी निवडणूक नायब तहसीलदार हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडले.
यावेळी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव तथा सरपंच उपसरपंच व ब्रिगेड चे पदाधिकारी उपस्थित होते.
"या" आश्वासनंतर संभाजी ब्रिगेडचे उपोषण मागे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 17, 2023
Rating:
