मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बि.आर.एस) पार्टीचे राजुरा विधानसभा क्षेत्रात झाले आगमन...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राजुरा : दि.17 एप्रिल 2023 चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये बी आर एस (BRS) पार्टीचे आगमन आज झाले अजून, दरम्यान शेकडो कार्यकर्ते आज संपन्न झालेल्या बैठकीस उपस्थित होते. त्यामुळे सीमाप्रभावित राज्याच्या कुशल कार्याचा नेतृत्वाचा शिरकाव महाराष्ट्रात होत असून यात ॲड संतोष कुळमेथे व प्रा. आनंदराव अंगलवार, प्रा हितेश मडावी,बाबा मस्की, ह्यांनी आज भारत राष्ट्र समिती ला मानणाऱ्या व विधिव संघटनेच्या पदाधिकारी ह्यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले. यावेळी शेकडो विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते भारत राष्ट्र समिती च्यां विचारधारा व त्यांचे कार्य घराघरात पोहचवण्याचे कार्य करून प्रस्तापित पक्षांना टक्कर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असेच आज प्रण घेण्यात आले.

नागपूर येथील झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले तालुक्यातील प्रत्येक गावात पार्टी व तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कार्याची माहिती प्रत्येक गावात पोहोचण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांना देण्यात आली. येणाऱ्या काळातील प्रत्येक निवडणुका भारत राष्ट्र समिती स्वतंत्र निवडणुका लढण्यास सज्ज आहे व त्यासाठी अनेक कार्यकर्ते कार्यकर्ते इच्छुक पण आहेत अशी माहिती आज देण्यात आली. प्रस्तापित राजकीय पक्षातील नाराज मंडळी बि आर एस पक्षाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. राजुरा तालुक्यातील बरेचसे नेते मंडळी बिआरएस पार्टीच्या ध्येय धोरणावर खुश असून लवकरच नागपूर विभागात होणाऱ्या मोठ्या सभेत पक्षप्रवेश करण्याच्या तयारीला लागलेले असून यात अनेक कार्यकर्ते बि आर एस पार्टीचे समर्थक बनून कार्यक्रम तयार झाले आहेत.
प्रत्येक गावा गावात भारत राष्ट्र समिती व तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ह्याचे विचार राजुरा विधानसभा क्षेत्रात घरो घरी पोहचवण्याचे कार्य करणार असल्याचे ॲड संतोष कुळमेथे ह्यांनी यावेळी बोलून दाखविले. राजुरा विधानसभा क्षेत्रात ज्यांना भारत राष्ट्र समिती व तेलंगाना चे लोकप्रिय मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ह्यांचा वर विश्वास आहे त्यांनी प्रवेशासाठी 9689199918 ह्या नंबर वर संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले. नांदा फाटा येथिल किशोर मडावी,व त्यांचे सर्व सहकारी, रेशमा चव्हाण ताई, बाबाराव मस्की, देवराव टेकाम, सुनील मेश्राम, सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बि.आर.एस) पार्टीचे राजुरा विधानसभा क्षेत्रात झाले आगमन...  मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बि.आर.एस) पार्टीचे राजुरा विधानसभा क्षेत्रात झाले आगमन... Reviewed by सह्याद्री चौफेर on April 17, 2023 Rating: 5
Powered by Blogger.