सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगांव : तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या पिक संवर्धन योजनेत प्रशासनाच्या विश्वासावर अॅग्रीकल्चर विमा कंपनी कडे कृषी कर्जदार व गैरकर्जदार शेतकऱ्यांनी पिकविमा काढला. मात्र,विमा कंपनीने काही शेतकर्याना केवळ ३३ टक्के रक्कम वितरित केली, त्यामुळे शेतकऱ्यांना विम्याची रक्कम १०० टक्के मिळावी यासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी मारेगाव तहसीलदार यांना निवेदन देऊन येत्या १७ एप्रिल पर्यंत उर्वरित विम्याची रक्कम न मिळाल्यास उपोषण करू असा ईशारा देण्यात आला होता,परिणामी पीकविमा कंपनीच्या अन्यायी धोरणाविरोधात आज सोमवार रोजी सकाळी ११ वाजेपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आले आहे.
आधीच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिक मालाला भाव नसल्याने जगाचा पोशिंदा आर्थिक संकटात आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामातील पिकाचा विमा केन्द्र शासन व राज्य शासनाच्या हिश्यासह शेतकर्यांनी विमा कंपनीकडे काढला मात्र,विमा कंपनीने शेतकर्यांना तोकडी रक्कम काही शेतकऱ्यांना अदा केली, त्यामुळे उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावी यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी सोमवार पासून तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले असतांना त्यांच्या उपोषणाला अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. व प्रधानमंत्री पीकविमा २०२२-२३ हा शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी मागणी सुद्धा केली.
यावेळी तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, सचिव सुरेश लांडे यांचेसह मारेगाव तालुक्यातील सरपंच उपसरपंच उपस्थित होते.
आता शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी बसलेल्या जिल्हाध्यक्ष यांच्या उपोषणाला व सरपंच परिषदेच्या जाहीर पाठिंब्याची दखल प्रशासन किती घेते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
मारेगांव : शेतकऱ्यांना १०० टक्के पिकविमा मिळण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे उपोषण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 17, 2023
Rating:
