युवा शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील मांगरूळ येथील एका अल्प भूदारक युवा शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ह्या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

प्रफुल्ल मोरेश्वर खडसे (31) असे नाव आहे. त्यांची अंदाजे पाच एकर कोरडवाहू शेती आहे. मांगरूळ शेत शिवारातील शेतातील विहिरीत त्याने उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना रविवारी दि.19 मार्च ला सकाळी उघडकीस आली. प्रफुल्ल यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन भाऊ असा आप्त परिवार आहे. प्रफुल याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. 

सदर घटनेचा तपास पोलीस करित आहे.
युवा शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या  युवा शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on March 19, 2023 Rating: 5
Powered by Blogger.