सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : राग ही भावना आहे जी एखाद्या व्यक्तीशी वैरभावनेद्वारे दर्शविली जाते किंवा जाणूनबुजून चुकीचे करण्याचा प्रयत्न करतो. परिणामी कोण कुठचा राग कुठे काढतील याचा नेम नाही. असाच राग एका आटोरिक्षाचे भाडे देत नसल्याने राग अनावर होत चालकाने चक्क! शेतकऱ्याचा शेतातील चनाच्या गंजीला आग लावून किमान 1 लाख रुपयाचे नुकसान केल्याची घटना दि. 18 मार्च 2023 रोजी रात्री अडीच वाजताच्या दरम्यान वाघदरा येथे घडली.
वागदरा (ता. मारेगाव) खैरगाव शेत शिवारात योगेश कावडे यांनी आपल्या शेतात कापणी करून जमा करून ठेवलेल्या चना च्या गंजीला शनिवारी (ता. 18) रात्रीच्या वेळी संशयित व्यक्ती संतोष नत्थु भोयर रा.वाघदरा याने आग लावली. कावडे यांनी आपल्या शेतात घेतलेल्या हरभराच्या पिकाची कापणी केली होती. या कापणी केलेल्या चन्याची शेतातच एका ठिकाणी गंजी (ढीग) लावली होती. मात्र, कष्टाने पिकविलेल्या या हरभराच्या पिकाच्या गंजीला संतोष भोयर रात्रीच्या वेळी आग लावून नुकसान केले. 20 ते 25 क्विंटल चना जाळून खाक केला.यात 1 लाख रुपयाच्या वर नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
या घटनेच्या विरोधात फिर्यादीच्या तक्रारी वरून संशायित आरोपी संतोष नत्थु भोयर यांचे विरुध्द भादंवी ४३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वागदऱ्यात चण्याच्या ढिगाला संशयितानी लावली आग
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 20, 2023
Rating:
