सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के
महागांव : सध्या कापसाचे दर दिवसागणिक भाव घसरत असल्यामुळे शेतकऱ्याने शेतातील कापूस साठवून ठेवला आहे. आज ना उद्या कापसाला भाव मिळेल या आशेत शेतकरी बसला आहे. पण मात्र, अवकाळी पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली आणि शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले. तालुक्यातील बेलदरी येथे वीज पडल्याने एका शेतकऱ्याच्या कापसाच्या गंजीला आग लागून लाखों रुपयाचे नुकसान झाले. ही घटना 18 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
जयवंत गुलाबसिंग आडे असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत अशी माहिती मिळाली की, शेत सर्वे नंबर 50 मध्ये रात्री आठ च्या सुमारास अचानक रात्री वादळी पाऊस व विजेचा कडकडाट झाल्याने वीज पडून शेतातील घरामधील साठवून ठेवलेल्या सुमारे 70 क्विंटल कापूस जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे लाखों रुपयाचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
आडे यांचे शेतात पक्के घर असून शेतामध्ये जनावरे, सर्व साहित्य व शेतात निघालेला संपूर्ण माल शेतातच ठेवला असतांना सकाळी शेतात सालगडी सुरेश जाधव झाडू मारण्यासाठी गेला असता, घरा मधून धूर निघत असल्याचे आढळून आले. दरम्यान, आरडाओरड केली वं गावकरी शेतात धाव घेत कापूस विझवण्याचा प्रयत्न केला, सुदैवाने बाजूला बांधलेले बैल सुरक्षित असून जीवितहानी झालेली नाही. वृत्त लिहेपर्यंत अद्याप प्रशासन घटनास्थळी दाखल झाले नसून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
वीज पडून शेतकऱ्याचा 70 क्विंटल कापूस जळून खाक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 19, 2023
Rating:
