एकच मिशन,जुनी पेंशन: कर्मचाऱ्यांच्या संपाला राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा....

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

वणी : नोव्हेंबर 2005 पासून बंद केलेली जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारचे शासकीय व निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मंगळवारपासून (14 मार्च) बेमुदत संपावर गेले असून, त्यांच्या रास्त मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा दिनांक 17 मार्च 2023 ला जाहीर पाठिंबा असल्याचे राष्ट्रवादी चे जिल्हा सरचिटणीस विजय नगराळे यांनी सांगितले. 

जुनी पेन्शन योजना सुरू करावी या करिता शासकीय कर्मचारी संपावर असून या संपामुळे शासकीय रुग्णालये, शाळा, पंचायत समित्या, महापालिका, जिल्हा परिषदा तसेच तहसील कार्यालयांसह सरकारी विभागांचे कामकाज ठप्प झाले आहे. अनेक वर्षांनंतर सर्व स्थरांतील अधिकारी-कर्मचारी एकटवले असून त्यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे, विविध मागण्यापूर्ण व्हाव्या करिता सुरू असलेल्या संपाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा जाहीर पाठिंबा असल्याचे जिल्हा सरचिटणीस विजय नवराळे यांनी सांगितले. 
  
     यावेळी रा. काँ. जि.उपाध्यक्ष मुबीन शेख, ओबीसी सेल अध्यक्ष गुणवंत टोंगे, तालुका अध्यक्ष सूर्यकांत खाडे, शहर उपाध्यक्ष रामकृष्ण वैद्य, सुरेश पिसे, सौ किरण कोकणे, मेघराज गेडाम आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
एकच मिशन,जुनी पेंशन: कर्मचाऱ्यांच्या संपाला राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा.... एकच मिशन,जुनी पेंशन: कर्मचाऱ्यांच्या संपाला राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा.... Reviewed by सह्याद्री चौफेर on March 19, 2023 Rating: 5
Powered by Blogger.