सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : वणी वाहतूक शाखे कडून सर्व नागरिकांना कळविण्यात येते की,वणी वरोरा एन. एच.(९३०) रस्त्यावरील वर्धा नदी वरील पाटाळा येथील जुन्या पुलाची दुरूस्ती AGIP कंपनी कडून रविवारी दिनांक १९ मार्च २०२३ रोजी रात्री ८ वाजता ते २० मार्च २०२३ चे सकाळी ८ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे NHAI चे विनंती नुसार सदर पुलावरील रस्ता हा पुर्णतः वाहतूकीसाठी बंद होणार असल्याने कुठल्याही वाहनास (दुचाकी देखील) वणी कडून वरोरा कडे किंवा वरोरा कडून वणी कडे जाता येणार नाही. संपूर्ण प्रकारची वाहतूक बंद करण्यात येणार असल्याने आपली गैरसोय होऊ नये म्हणून सदर मार्गाने जाणे टाळावे तसेच वाहतूक बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचारी यांच्याशी वादावादी करु नये. आपली गैरसोय टाळण्यासाठी खालील पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.
वणी वरून वरोरा कडे जाण्यासाठी मार्ग :
वणी-घुग्गुस-साखरवाही फाटा-भद्रावती-वरोरा.
वरोरा कडून वणी कडे जाण्यासाठी मार्ग :
वरोरा-भद्रावती-साखरवाही फाटा-घुग्गुस-वणी असा वाहतुकीची मार्ग ठरविण्यात आला आहे, त्यामुळे दर्शविलेल्या मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन संजय आत्राम सपोनि वाहतूक शाखा वणी यांनी केले आहे.
वणी वाहतूक शाखेचे वणी परिसरातील नागरिकांना आवाहन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 18, 2023
Rating:
