सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मोदी सरकार नियमितपणे देशभरातील जनतेसाठी विविध शासकीय योजना राबवत आहे. त्याचा फायदा देशभरातील करोडो नागरिकांना झाला आहे. आता केंद्रशासनांतर्गत खास विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना राबवली जात आहे. त्या योजनेचे नाव आहे शिष्यवृत्ती योजना.
आपल्या देशभरामध्ये असे काही विद्यार्थी आपल्याला दिसून येतील जे हुशार आहेत परंतु त्यांच्याकडे पुरेपूर शिक्षण घेण्यासाठी पैसे उपलब्ध नाहीत. म्हणजेच त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला शिष्यवृत्ती भेटेल.
सदर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करायचा आहे. खास विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना पदवीच्या अभ्यासक्रमासाठी दिली जात असून ज्या विद्यार्थी विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर अशा विद्यार्थ्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळ ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे.
या तारखेपर्यंत अर्ज करा
शासनाने राबवलेल्या पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ही 15 एप्रिल 2023 पर्यंत सुरू असेल. शासनाच्या माध्यमातून 15 एप्रिल पर्यंत अर्ज स्वीकारले जातील पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वार्षिक 36 हजार रुपयांची मदत दिली जाईल.
या शिष्यवृत्तीसाठी पात्रता
या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्याकरिता विद्यार्थ्यांसाठी काही पात्रता निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये बारावीला विद्यार्थ्यास किमान 60 टक्के गुण असलेच पाहिजेत. यापेक्षा जर कमी गुण मिळाले असतील तर अजिबात शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार नाही. यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना 60% च्या पुढे गुण आहेत त्यांना नक्कीच लाभ भेटेल.
विद्यार्थ्यांना दरमहा मिळणार 3000 रुपयांची शिष्यवृत्ती! 'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 17, 2023
Rating:
