मारेगांव शहरातील बंगाली डॉक्टरला पिस्तुलाचे धाकावर अपहरण करून खंडणी वसुल करणाऱ्या टोळीचा लागला ठावठिकाणा

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : १३ मार्च २०२३ रोजी चे रात्रीचे सुमारास मारेगांव येथील बंगाली डॉ. पोभास रविद्रनाथ हाजरा हे नवरगाव येथील दवाखाना बंद करुन त्यांचे मोटार सायकलने घरी जात असतांना एका चारचाकी वाहनातून आलेल्या आरोपीतांनी आपले वाहन त्याच मोटार सायकल समोर लावून त्या चारचाकी वाहनातील तिन अनोळखी इसमांनी डॉ. हाजरा यांचे कानाला पिस्तुल लावून त्यांना गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले व त्यांना चाकुचा धाक दाखवून त्यांचे अंगावरील सोन्याची अंगठी व मोत्याचा गोफ तसेच नगदी २४,००० रु असा एकूण ४५,०००/- रु चा मुददेमाल हिसकावून घेवून त्यांच सुटकेसाठी २५ लाखाची खंडणी मागीतली.त्यावरुन डॉ. पोभास यांनी आपल्या मित्राकडुन सदरचे आरोपीतांना ३,००,०००/- रु दिल्याने आरोपीतांनी त्यांची सुटका केली. सदर प्रकरणी फिर्यादी डॉ. पोभास हाजरा यांनी पो.स्टे. मारेगांव येथे दिलेल्या फिर्याद वरुन अज्ञात आरोपीतांविरुध्द अप.क्र. १८८/२३ कलम ३९२.३६३.३६४ (अ), भादवि सहकलम ३/२५,४/२५ आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

तालुक्यात अशा स्वरुपाची गंभीर घटना घडली असल्याने लागलीच शेजारील जिल्हे व तेलंगणा राज्यातील आदीलाबाद येथील पोलीस नियंत्रन कक्षांना तात्काळ सतर्क करून आपआपले परिसरात नाकाबंदी लावण्याबाबत कळविण्यात व स्वा.गु.शा. तसेच पो.स्टे. मारेगांव येथील पथक तयार करून आरोपीतांचं मागावर रवाना करण्यात आले.

दरम्यान,दोन्ही पथकांना अदिलाबाद येथील पोलीसांशी समन्वय साधून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, त्यावरून सदरची पथके अदिलाबाद पोलीसांचे संपर्कात असतांना मारेगांव येथील घटनेच्या काही तासातच रात्रीच्या दरम्यान,अदिलाबाद येथे सुध्दा नमुद आरोपीतांनी मारेगांव सारखीच घटना करण्याचा प्रयत्न केला. परंतु यवतमाळ पोलीसांनी अदिलाबाद पोलीसांना सतर्क केले असल्यामुळे अगोदरच अदिलाबाद शहरात नाकाबंदी लावण्यात आल्यामुळे आरोपीतांचा प्रयत्न अयशस्वी झाला व त्यांनी वाहन तेथेच सोडुन पळ काढला. त्यातील २ आरोपीतांना पकडण्यात अदिलाबाद पोलीसांना यश आले.

 वेळीच स्था.गु.शा. यवतमाळ तसेच पो.स्टे. मारेगाव येथील पथक तेथे पोहचुन त्यांनी अदिलाबाद पोलीसांशी समन्वय साधुन माहिती वेळेत पोहचविल्यामुळे त्यातील अधिक ०३ आरोपीतांना झांसी येथून ताब्यात घेतले आहे. तेथील पोलिसांचा तपास झाल्यानंतर प्रोड्यूस वारंट च्या माध्यमातून मारेगाव त्या तिघांना ताब्यात घेणार आहे. 


मारेगांव शहरातील बंगाली डॉक्टरला पिस्तुलाचे धाकावर अपहरण करून खंडणी वसुल करणाऱ्या टोळीचा लागला ठावठिकाणा मारेगांव शहरातील बंगाली डॉक्टरला पिस्तुलाचे धाकावर अपहरण करून खंडणी वसुल करणाऱ्या टोळीचा लागला ठावठिकाणा Reviewed by सह्याद्री चौफेर on March 18, 2023 Rating: 5
Powered by Blogger.