शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनाला १२ हजार रुपये भाव द्या - अखिल भारतीय सरपंच परिषदेची मागणी

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : कापसाच्या दरात घट झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. सततच्या दरात घट होत असल्यामुळे उत्पादकांनी पांढरे सोने घरात साठवून ठेवलेआहे. परिणामी शेतकऱ्यांच्या कापसाला १२ हजार रुपये भाव द्यावा अशा आशयाचे निवेदन मारेगाव तहसील कार्यालयाला तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.
या वर्षी मारेगाव तालुक्यातील कापसाचे उत्पादन कमी असल्यामुळे प्रतिक्विंटल १० ते १२ हजारांपर्यंत भाव मिळण्याची अपेक्षा होती. कापसासाठी लागणारा खर्च व सध्या मिळणारा ८ हजारांपेक्षा कमी भाव या बाबी पाहता शेतकऱ्यांना हा भाव परवडणारा नसल्याची खंत अविनाश लांबट सह शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वा अन्य कापूस खरेदी जिनिंग मध्ये कापसाच्या भावात सतत घसरण असून रोज अस्थिरता दिसुत येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. 
कापसाला योग्य भाव मिळत नाही, मारेगाव तालुक्यातील कॉटन मार्केट चे धोरणही शेतकऱ्यांच्या विरोधात दिसून येत आहे,आता भाव वाढण्याची अपेक्षा उरलेली नाही. कमी भावात कापूस विकल्यास तोटा होईल. सरकारने यावर उपाययोजना करावी अन्यथा अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. याची तात्काळ मुख्यमंत्र्यांनी दखल घेवून शेतकऱ्यांच्या कपाशी ला किमान १२ हजार रुपये भाव द्यावा यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने मागणी आहे.
यावेळी तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, सचिव सुरेश लांडे, उपसरपंच प्रशांत भंडारी, सरपंच रामचंद्र जवादे, सरपंच संदीप कारेकर, सरपंच सौ विना सातपुते, नारायण सातपुते, उपसरपंच प्रफुल विखणकर, सरपंच विनोदी आत्राम, सरपंच दयानंद कुळमेथे, गणपत आदेवार, सरपंच तुळशीराम कुमरे आदी सह उपस्थित होते. 
शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनाला १२ हजार रुपये भाव द्या - अखिल भारतीय सरपंच परिषदेची मागणी शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनाला  १२ हजार रुपये भाव द्या - अखिल भारतीय सरपंच परिषदेची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on March 22, 2023 Rating: 5
Powered by Blogger.