सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956 मध्ये झाला. हरियाणाच्या महेंद्रगड येथे त्यांचा जन्म झाला होता. सतिश कौशिक यांनी आपल्या करीअरची सुरुवात 1983 मध्ये आलेल्या 'जाने भी दो यारो' या सिनेमातून केली होती. त्यानंतर त्यांनी 100 हून अधिक सिनेमात काम केलं. 1993 मध्ये त्यांनी रुप की रानी चोरों का राजा या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर त्यांनी डझनभर सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यांनी अनेक सिनेमांचीही निर्मिती केली. सतीश कौशिक यांचं वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी प्रत्येक प्रकारच्या भूमिका केल्या. मात्र, त्यांच्या विनोदी भूमिका अधिक गाजल्या. त्यांच्या विनोदी भूमिकांना तोड नव्हती.
मिस्टर इंडियातील कॅलेंडर ची भूमिका गाजली
सतीश कौशिक यांची मिस्टर इंडियातील भूमिका सर्वाधिक गाजली. त्यांना दोन वेळा बेस्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळालेला आहे. अभिनेता गोविंदासोबतचा त्यांचा कॉमेडीचा टायमिंग अफलातून असायचा. त्यांच्या छोट्या भूमिकाही प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहायच्या.
करीयर
सतीश कौशिक यांनी दिल्लीच्या करोलबागमध्ये आपलं शिक्षण घेतलं. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या करोडीमल कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. 1978 मध्ये तिथून ते पास झाले आणि त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात शिक्षण घेतलं.
त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीतला एक चकणारा तारा निखळला. त्यांच्या निधनावर चित्रपट श्रुष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.
जेष्ठ विनोदी अभिनेता 'सतीश कौशिक' यांचं निधन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 09, 2023
Rating:
