सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : तालुक्यातील लालगुडा-भालर-बेसा लाठी निवली-तरोडा ही गावे वेकोली बाधित क्षेत्रात येत असताना येथे कोळशाची जड वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते आहे. परिणामी १२ टन वजनाचे रस्ते असताना सदर रस्ता पुरता उखळला आहे.याबाबत परिसरातील सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद बांधकाम विभाग वणी ला निवेदन देण्यात आले.
शहरालगत असलेल्या लालगुडा गावापासून वेकोली क्षेत्रात येत असलेल्या अनेक गावात जाण्यासाठी जनतेला,सोबतच कामावर जाणाऱ्या कामगारांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमन करावे लागते आहे. वेकोली बाधितक्षेत्र असतांना वेकोलीचा फंड जातोय कुठे हाच खरा प्रश्न आहे. मग लोकप्रतिनिधी केवळ मतांचा जोगवा मागण्यासाठी फिरते की स्वतःचे खिसे गरम करते,हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते आहे. जवळच्या चेले आणि जिवलग असलेल्या कार्यकर्त्यांना पाठबळ देत रस्त्यांच्या कामाची खैरात वाटत आहे. परिणामी यात नेते आणि त्यांचे चले स्वतःच चांगभलं करीत सामान्यांच्या जीवाशी खेळ करीत आहे.
बाधित क्षेत्रात येत असलेले रस्ते त्वरित डांबरीकरण करून जनतेला न्याय देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील सरपंच यांनी केली आहे.यापुढे कोणतीही जीवित हानी झाल्यास प्रशासन जबाबदार असेल अश्या पध्दतिचे निवेदन मनोज ढेंगळे,राहुल खारकर,बबन वाटेकर,सचिन घोंगडे,प्रमोद देवतळे,मनोज बोढे,लोकेश ठावरी यांनी दिले.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाला वणी ते भालर व भालर ते तरोडा रोडच्या मागणीचे निवेदन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 09, 2023
Rating:
