दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी, पोलिसात गुन्हा दाखल

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : नवरा, दोन मुली सोडून तीने दुसऱ्याशी पळून संसार थाटला. वर्षभर गावाबाहेर राहून ते दोघेही गावात येवून प्रियकराच्या घरी 'ती' विवाहित नांदतेय. त्यामुळे नजरेस नजर भिनत असल्याने संताप अनावर होऊन प्रचंड दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली, अखेर 'अजब प्रेमाची गजब गोष्ट' मारेगाव पोलिसात धडकले. 

मिळालेल्या माहितीनुसार, 29 वर्षाची विवाहितेचा गावातील एका युवकांवर जीव गुंतला. ठाण्याच्या हद्दीत राहणारी ही प्रेमियुगल एकमेकांच्या प्रेमात इतके बेभान झाले की तीने पती, दोन मुलं बाजूला सारून त्याच्याशी संसार थाटण्याचा बेत आखून ते दोघेही गावातून पसार झाले. दोघांमध्ये प्रेम संबंध होते. बाहेर वर्ष लोटत आल्यातच त्यांनी 'आ अब लौट चले' म्हणत मुळं गावी परतले. 

मात्र, पुर्वश्रमीचे कुटुंब नव्याने संसार करण्याऱ्या कुटुंब यांच्यात नजरेस नजर पडत असल्यामुळे आक्रोश निर्माण होऊन काल बुधवारला रात्रीच्या सुमारास दोन्ही परिवारातील नातेवाईक एकमेकांवर तुटून पडले, रागाची मर्यादा ओलांडली आणि लाठ्या काठ्याने मारहाण करित दोन महिला सह एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. यात एका महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला चंद्रपूर येथे रवाना केले.

मारेगाव पोलीस ठाण्यात चंद्रशेखर शेडमाके यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुभाष सोयाम यांचेवर 324,504,506 तर विद्या सुनील शेडमाके हिने दिलेल्या तक्रारीवरून चंद्रशेखर हुसेन शेडमाके, राजू राजाराम कोडापे, कल्पना राजू कोडापे, शंकर उत्तम तोडासे सर्व रा.चिंचमंडळ यांचेवर 324, 323, 294, 504, 506,  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी, पोलिसात गुन्हा दाखल दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी, पोलिसात गुन्हा दाखल Reviewed by सह्याद्री चौफेर on March 09, 2023 Rating: 5
Powered by Blogger.