महिलांना अर्ध्या तिकीटावर एसटी प्रवास योजनेची अंमलबजावणी एप्रिलपासून..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

एसटी महामंडळाच्या सर्व बसमधून महिलांना अर्ध्या तिकिटावर राज्यात कोठेही प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या जाहीर केलेल्या योजनेची अंमलबजावणी एप्रिलपासून होणार असून या योजनेमुळे सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम राज्य सरकार महामंडळाला मिळेल. त्यातून उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक अडचणीतील लालपरीला नवसंजीवनी मिळणार आहे.

 सध्या एसटीतून दररोज ५० ते ५५ लाख प्रवासी प्रवास करतात आणि विविध योजनांमुळे महामंडळाला दिवसाला (प्रतिपूर्ती रक्कमेसह) २२ ते २४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे. त्यातून अडचणीतील लालपरीचा प्रवास सुरू आहे. आता राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार परिपत्रक निघाल्यानंतर महिलांना प्रवास दरात ५० टक्क्यांची सवलत लागू होईल. त्याचाही मोठा आधार लालपरीला मिळणार आहे.

नोकरदार व माहेरवासिनींना लालपरीचा आधार
एसटीने प्रवास न करणाऱ्या महिला सध्या पर्यायी वाहनांचा वापर करतात. अनेक नोकरदार स्त्रिया स्वतःची दुचाकी अथवा चारचाकी घेऊन ये-जा करतात. काही महिला वडाप, ॲटोरिक्षातून जातात. तर अनेकजण कुटुंबासोबत खासगी वाहनाचा वापर करतात. त्या महिला आता एसटीकडून ५० टक्के सवलत मिळणार असल्याने लालपरीतून प्रवास करतील. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला भरघोस उत्पन्न मिळेल आणि अडचणीतील लालपरीची स्थिती सुधारेल, असा विश्वास महामंडळाला आहे.

महिलांना अर्ध्या तिकीटावर एसटी प्रवास योजनेची अंमलबजावणी एप्रिलपासून.. महिलांना अर्ध्या तिकीटावर एसटी प्रवास योजनेची अंमलबजावणी एप्रिलपासून.. Reviewed by सह्याद्री चौफेर on March 15, 2023 Rating: 5
Powered by Blogger.