सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे
मारेगाव : जिल्ह्यातील रेती घाटाचे लिलाव झाले नसल्यामुळे मारेगाव तालुक्यातील रेती घाट पूर्णतः बंद असल्याने याचा फटका घरकुल लाभार्थी व विकास कामांना बसत आहे. घरकुल योजनेसह गांव पातळीवरील विकास कामे पूर्णतः ठप्प पडलेले आहेत. त्यामुळे सर्वांगीण विकासाची ग्वाही देणाऱ्या शासन प्रशासनाने घरकुल लाभार्थी यांना त्वरित रेती उपलब्ध करून द्यावी, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय सरपंच परिषद, मारेगाव च्या वतीने तहसीलदार दिपक पुंडे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
या पूर्वी याच विषयाला घेवून सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी दि.21 फेब्रुवारी 2023 रोजी निवेदनातून मागणी केली होती, परंतु प्रशासनाने मागील मागणीला केराची टोपली दाखवल्याने पुन्हा तीच मागणीला धरून सुस्तावलेल्या शासन प्रशासनाला जागे करण्यासाठी आज बुधवारला पुन्हा निवेदन देऊन रेतीची मागणी करण्यात आली आहे.
परिणामी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष न करता घरकुल लाभार्थ्यांच्या बांधकामाचा मुख्य घटक वाळू हा असल्यामुळे येत्या चार दिवसात रेती उपलब्ध करून देण्यात यावी, अन्यथा अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना घेवून पंचायत समिती समोर उपोषणाला बसण्यात येईल, या दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास आपली सर्वस्वी जबाबदारी राहील. असा गर्भित इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी परिषदेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनावर सचिव सुरेश लांडे, प्रशांत भंडारी, विना सातपुते, निर्मला आत्राम, प्रवीण नान्हे, मारोती तुराणकर, नारायण सातपुते, भय्याजी कनाके, संजय मोहितकर, हनुमान बावणे, अनंत गोवर्धन यांच्या सह्या आहेत.
मारेगाव प्रशासनाच्या विरोधात अखिल भारतीय सरपंच परिषद उपोषणाला बसणार - अविनाश लांबट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 15, 2023
Rating:
