सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
सेवापूर्ती आयुष्यातील सुखदुःखाचा समन्वय साधणारा हा क्षण...सुख यासाठी की साठीच्या उंबरठ्यावर पडलेलं पहिलं पाऊल. रोजच्या कार्यालयीन दैनंदिन जीवनाला पडलेला अंतिम थांबा. त्यामुळे कुटूंबाला मिळणारा पूर्ण वेळ.
पत्नी, मुले, नातवंडात, आप्त नातेवाईक व मित्रजणात रमायला मिळणारा काळ. पाहिजे तसे मनाला आनंद देणारे क्षण टिपता येतात. परिवारातील सुखदुःखात सहभागी होता येते.
दुःख यासाठी की रोज कामात दिला जाणारा वेळ पुन्हा अनुभवणे नाही. नित्य ठरलेल्या शैलीतून पुढील आयुष्यासाठी नवीन वळण वा मार्ग निवडायचा तर जुनं सारं सोडावा लागेल. कार्यालयीन कर्मचारी, कामसंबंधीत येणारी लोकं व त्यांच्या समवेत घालवलेला वेळ हे सारं कधीही न विसरणारा आयुष्यातला भाग. हे सर्व सेवासमाप्तीमुळेच.
सेवानिवृत्ती आयुष्यात न चुकणारा कार्यकाळ प्रत्येक कर्मचाऱ्यांना यातून जावे लागते.
असा हा क्षण 28 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक, आमचे मार्गदर्शक श्री. पुरुषोत्तम पी. गमे सर हे सेवानिवृत्त झाले. सरांनी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात आपले नाव लौकिक केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत आपली चुणूक दाखवली. विविध क्षेत्रात नवोदितांना अनमोल मार्गदर्शन करून सदैव त्यांच्या पाठीशी राहिले आहे.
आता सामाजिक क्षेत्रासाठी भरपूर वेळ मिळाला असला तरी शाळेसाठी व शाळेतील मुलांसाठी मात्र त्यांची रिक्तता भरून न येणारी आहे. तरीदेखील येणाऱ्या प्रसंगास स्विकारणे लागेलच. म्हणून आदरणीय पुरुषोत्तम पी गमे सर नियोत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहे. त्यांचा शुक्रवार दि.10 मार्च ला सकाळी 11.30. वा. शाळा व्यवस्थापन समिती तथा ग्रामपंचायत सिंधी महागाव तर्फे यांच्या सेवापूर्ती सोहळा सत्कार समारंभ आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री किशोर गज्जलवार गटविकास अधिकारी पं स मारेगाव, प्रमुख अतिथी मा श्री नरेंद्र कांडूलवार गट शिक्षण अधिकारी पं स मारेगाव हे आहे. तर विशेष अतिथी निलिमा थेरे सरपंच, अविनाश लांबट उपसरपंच तथा तालुका अध्यक्ष अ.भा.स. सं.मारेगाव, गजानन लांबट अध्यक्ष शाळा व्य. स., गजानन खापणे,माजी सभापती पं स मारेगाव, प्रवीण डाहुले, ग्राम सदस्य तथा माजी सरपंच, देविदासजी लांबट, माजी पोलीस पाटील, संगीता वाघाडे ग्राम. सदस्य, विमल आत्राम ग्रा. पं. सदस्य, जोती वाकडकर उपाध्यक्ष शा.व्य.स, हे असणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन पवन मिलमिले, गणेश खुसपुरे, मुरलीधर बलकी, पंढरी लांबट, मंगल दूधकोहळे, रेखा आत्राम, टिळक खोब्रागडे यांनी केले आहे.
श्री पुरुषोत्तम पी गमे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 09, 2023
Rating:
