सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिषेक सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी संपन्न होणार असून, त्यानंतर दुपारी 4 वा. झरी मारेगाव वणी विधानसभा क्षेत्रातील असंख्य मनसैनिक दुचाकी सह शहरात दाखल होऊन शहरातील मुख्यमार्गांवर बाईक रॅलीने फेरफटका मारून शिवतीर्थावर दाखल होतील.
तसेच या प्रसंगी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून शिवतीर्थावर उभारण्यात आलेल्या आकर्षक देखाव्याचे उदघाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर हे करतील. दरम्यान, ढोल ताशाच्या गजरात व फटाकाच्या आतिषबाजीत होईल, विशेष उल्लेखनीय की, विद्युत रोषणाई व लेजर शो द्वारे भव्यदिव्य अशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येईल, अशी माहिती आयोजकांनी दिली.
वणी येथील शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवजनमोत्सव..
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 09, 2023
Rating:
