टॉप बातम्या

अधिकाऱ्यांनी सामान्य जनतेशी सौहार्दाने वागावे – परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना राज्यपालांची सूचना

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : लोकशाहीमध्ये प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते व त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा असतात. सामान्य जनतेचा अधिकाऱ्यांवर विश्वास असणे महत्त्वाचे असते व त्याकरिता अधिकाऱ्यांचे जनतेप्रति आचरण चांगले असले पाहिजे, असे सांगताना अधिकाऱ्यांनी सामान्य जनतेशी सौहार्दाने वागले पाहिजे, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना केली.

भारतीय पोलीस सेवेच्या 2021 च्या तुकडीतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. ९) राज्यपाल बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

प्रामाणिकपणे जनतेचा विश्वास संपादन करून समाजासाठी व देशासाठी काम केले तर लोक सदैव लक्षात ठेवतात; बदली झाल्यावर त्या अधिकाऱ्याचा मानसन्मान करतात. असे सांगून अधिकाऱ्यांनी आदर्श जपावे व देशाची सच्ची सेवा करावी, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
Previous Post Next Post