सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मुंबई : लाखो रुपये वेतन घेऊन समाजसेवा करणाऱ्या आमदाराला घरी बसवून मला संधी द्या. मी 25% वेतन व विना पेन्शन समाजसेवा करिन असा मनोदय आरपीआय (संविधान) पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केला.
सध्या पेक्षा होणारा खर्च पाहता आज आमदाराणा मिळत असलेल्या लाखो वेतनाच्या 25% टक्के वेतनावर मी राज्याचा राज्य कारभार चालवून एक समाजसेवेचा आदर्श घडवून आणीन.
तसेच मिळत असलेल्या VIP सुविधे विना देशसेवा व जनसेवा करून एक नवीन आदर्श पायंडा निर्माण करवून देण्याचे अभिवचन सुद्धा पॅन्थर राजन माकणीकर यांनी दिले.
शिवाय आरपीआय (संविधान) पक्षाची सत्ता आल्यास जातींचा अंत करून मानवता रुजवण्याचे काम आमचे प्रतिनिधी करतील. संविधानिक राज्यात भाषण न देता के.जी ते पी.जी शिक्षण मोफत देऊन 100 टक्के राज्य साक्षर करून लोकशाही मजबूत करतील. असा ही आशावाद डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केला.
मला संधी द्या, मी 25 टक्के वेतन व विना पेन्शन आमदाराचे काम करिन- डॉ. पॅन्थर राजन माकणीकर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 18, 2023
Rating:
