क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्त नरसाळा येथे भव्य रक्तदान शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रम

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : 1857 चा स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथे आदिवासी जनजागृती युवा संघटना व विरांगना रांनी दुर्गावती महिला संघटना द्वारा आयोजित भव्य रक्तदान शिबीर तथा गोंगो पूजा कार्यक्रम व व्याख्यान तसेच सांस्कृतिक कार्यक्रम दि.19 मार्च रोज रविवारला श्रीकांत देशपांडे यांच्या शेतात सकाळी 9 वाजता रक्तदान शिबीर तर, अन्य कार्यक्रम 11 ते सायं. 7 या वेळात सुसंपन्न होणार आहे.

कार्यक्रमाचे उदघाटक अरविंद भाऊ ठाकरे (सरपंच कुंभा ग्राम तथा अभा.संप महा. राज्य.कार्यकारिणी सदस्य, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा वसंतराव कनाके (आदिवासी साहित्यिक विचारवंत लेखक), तर प्रमुख वक्ते कविताताई गेडाम (महा. राज्य कस्ट्राईड कर्म कल्याण महा. संघ पुणे सामाजिक कार्यकर्त्या तथा प्रखर वक्त्या), रामचंद्र आत्राम (शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते), मा. सुभाषभाऊ टेकाम (युट्युब चॅनल : स्टडी सर्कल व सामाजिक कार्यकर्ते), तसेच प्रमुख पाहुणे संगीत मरस्कोल्हे सरपंच, सुधाकर उईके माजी सरपंच, प्रभाकर उईके गोंगंपा अध्यक्ष, दिपक भाऊ मते, पिंपळगाव सरपंच, उज्वलाताई मडावी पेसा सदस्य, किशोर सुरपाम पेसा समिती सदस्य, सचिन मेश्राम अध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार संघ, मारेगाव हे असणार आहे.

जयंती निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम सह रक्तदान शिबिरात तालुक्यातील व्यक्तीनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आदिवासी जनजागृती युवा संघटना व विरांगना रांनी दुर्गावती महिला संघटना यांनी केले.

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्त नरसाळा येथे भव्य रक्तदान शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रम क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्त नरसाळा येथे भव्य रक्तदान शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रम Reviewed by सह्याद्री चौफेर on March 18, 2023 Rating: 5
Powered by Blogger.