टॉप बातम्या

किन्हाळा येथे रविवारी भव्य 'रक्तदान’ शिबीर..

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. कोरोना काळात राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला. आजही काही प्रमाणात गरज भासत आहे,हीच गरज लक्षात घेऊन किन्हाळा येथे शिवप्रतिष्ठान मंडळाने रविवारी, 19 फेब्रुवारीला किन्हाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच प्रशांतभाऊ तोरे, उदघाटाक शुभमभाऊ भोयर (सरपंच), प्रमुख पाहुणे भास्कर कपाळकर,
 प्रफुल गायधन, नानाजी आसेकर, बंडू गिरसावळे हे असणार आहे.

या उदघाटन प्रसंगी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला सर्वप्रथम हरार्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. 11 ते 5 या वेळात शिबिर होणार आहे, या शिबिरामध्ये परिसरातील जनतेनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असे मंडळाचे आयोजक हितेश गायधन, राहुल गाणफडे, प्रवीण देठे, आशिष तोरे, अमोल मडावी, चेतन डांगाले, गजानन बोधले, अनंता काठवठे,राजू शात्रकार, विकास चौधरी, संजय गाणफडे, राजू आडे, बंडू सिरसागर, विशाल सोमटकर, सुनील सोमटकर, रतन आत्राम, धीरज डांगाले, माधव परचाके, योगेश काठवठे, राज चौधरी, पुष्पराज गाणफडे, नितेश भोयर, प्रवीण काकडे, निलेश धोटे यांनी केले.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();